दि.11/01/2024 रोजी गोवा पर्पल फेस्टिवल 2024 पणजी येथे "कला अकादमी" येथे मल्टी स्टेट स्टाॅकहोलडर या कार्यशाळेत "संवेदना "प्रकल्पा च्या कार्याबद्दल सविस्तर माहिती श्री बस्वराज पैके यांनी दिली. यावेळी गोव्याचे समाज कल्याण मंत्री मा.श्री. सुभाष पाल देसाई, दिव्यांग कल्याण आयुक्त मा.श्री. पावसकर , महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त मा.श्री प्रवीण पुरी ,सक्षम चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री गोविंदराज जी , आयडिया सक्षम चे श्री मल्लिकार्जुन, श्रीमती सुमित्रा प्रसाद, ,श्री डॉ . संजय प्रधान जी व देशभरातून आलेले उद्यमी दिव्यांगजन, दिव्यांग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.