दि. ०९/१२/२०२३ रोजी जागतिक दिव्यांग (क्षमता) सप्ताह निमित्ताने फिजिओथेरपी (भौतिक उपचार पद्धती) शिबिराचे आयोजन
दि. ०९/१२/२०२३ रोजी जागतिक दिव्यांग (क्षमता) सप्ताह निमित्ताने फिजिओथेरपी (भौतिक उपचार पद्धती) शिबिराचे आयोजन
दि. ०९/१२/२०२३ रोजी जागतिक दिव्यांग (क्षमता) सप्ताह निमित्ताने इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपी वुमन सेल व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर कार्यान्वित अभिकर्ता रा स्व संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) संचलित संवेदना प्रकल्प हरंगूळ (बु) लातूर
यांच्या संयुक्त विद्यमाने फिजिओथेरपी (भौतिक उपचार पद्धती) शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी लातूर जिल्ह्यातील मेंदूचा पक्षघात (सेरेब्रल पाल्सी) दिव्यांगजनांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन व उपचार करण्यात आले. यावेळी २० दिव्यांगजनांना उपचारांचा लाभ मिळाला. यावेळी डॉ. श्रीमती पल्लवी जाधव व डॉ. शितल घुगे यांनी दिव्यांगजनांनची तपासणी केली व कृत्रिम अवयव तज्ञ श्री रुपेश जाधव यांनी कृत्रिम अवयव साठी मोजमाप घेतले. संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह डॉ योगेश निटूरकर यांनी दिव्यांगजणांच्या पालकांशी संवाद साधला. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे बहुउदेशीय पुनर्वसन कार्यकर्ता श्री बसवराज पैके, कार्यालयीन साह्ययक श्री परमेश्वर सोनवणे, मानसोपचार तज्ञ श्री नवाज शेख, विशेष शिक्षिका श्रीमती शितल सूर्यवंशी, संगणक प्रशिक्षक श्री अनुप दबडगावकर, श्री अन्नपूर्णा बनछरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी दिव्यांगजन व त्यांचे पालक उपस्थित होते.