वेळेचे नियोजन केले की तणाव कमी होतो. डॉ सुडे - मानसउपचार तज्ञ
वेळेचे नियोजन केले की तणाव कमी होतो. डॉ सुडे - मानसउपचार तज्ञ
जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर, पंचायत समिती लातूर आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 'संवेदना' प्रकल्प हरंगुळ (बु.) येथे आरोग्य सेवक, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी पर्यवेक्षक व दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. या कार्यशाळेत डॉ सुधाकर सुडे यांनी मार्गदर्शन करीत असताना म्हणाले की, मानसिक त्रास होत असेल तर वेळीच उपचार घेणे उपयोगाचे आहे. वर्तमान स्थितीत अनेकांच्या प्रचंड अपेक्षा वाढलेल्या आहेत. कुवतीपेक्षा खर्च करण्याची वृत्ती बळावत आहे. विभक्त कुटुंब व्यवस्थेमुळे , अशा अनेक कारणांमुळे तणाव वाढलेला आहे. हे कमी करण्यासाठी स्वतःला वेळ देणे, वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे.प्रत्येक व्यक्तीने चांगले विचार आत्मसात करणे जेणे करून माणुस योग्य निर्णय घेवू शकतो.
या प्रसंगी जिल्हा सेवा विधी प्राधिकरणाच्या सचिव मा. श्रीमती औसेकर मॅडम यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या विषयाचे महत्त्व प्रगट केले. सकारात्मक विचार, प्रसन्नतेचे वातावरण यासाठी पूरक आहे. या कार्यक्रमात संवेदना प्रकल्प संपर्क प्रमुख श्री. सुरेश पाटील यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे मानसिक स्वास्थ्याचे निकष विगत केले. जो व्यक्ती दुसऱ्यांचा विचार करतो, इतरांचा सन्मान करतो, त्याचे स्वास्थ्य चांगले असते. सर्व वयोगटात सहभागी होणारा व्यक्ती आनंदी असतो. नाविन्यता, नवनिर्मितीचा विचार करणाऱ्या व्यक्तींचे मानसिक स्वास्थ्य चांगले असते. या कार्यशाळेत जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक श्री. सतीश भापकर यांनी आजच्या दिनाचे महत्व सांगताना शिक्षणामधून मानसिक स्वास्थ्याचे धडे कसे द्यावेत? याची माहिती दिली. कार्यशाळेचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी श्री. भालके साहेब यांनी केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ पवार यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. या कार्यशाळेत अतिरिक्त मु.का.अ. तडवी साहेब, जि. समाज कल्याण अधिकारी श्री. नाईकवाडे साहेब यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ओमकार वंजारे पंचायत समिती औसा यांनी केले.कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी ग्रामसेवक , श्री धनासुरे, संवेदना शाळेतील विशेष शिक्षक श्री योगेश्वर बुरांडे, मयुर दंडे यांनी प्रयत्न केले.