जागतिक सेरेब्रल पालसी दिनानिमित्त ऑक्युपेशनल थेरपी (व्यवसाय उपचार) शिबिर संपन्न
जागतिक सेरेब्रल पालसी दिनानिमित्त ऑक्युपेशनल थेरपी (व्यवसाय उपचार) शिबिर संपन्न
जागतिक सेरेब्रल पालसी दिनानिमित्त ऑक्युपेशनल थेरपी (व्यवसाय उपचार) शिबिर संपन्न
दि. 6 व 7 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर या ठिकाणी टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व नायर चॅरिटेबल हॉस्पिटल, मुबंई आणि रा. स्व. संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) संचालित संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु) लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त दोन दिवसीय आॅक्युपेश्नल शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी नायर रुग्णालय मुंबई येथील आॅक्युपेश्नल थेरपिस्ट डॉ हर्ष जहागीरदार, डाॅ यश, डाॅ श्रद्धा,डाॅ.प्राजक्ता यांनी सेरेब्रल पाल्सी, स्वमग्न, बहुविकलांग बौध्दिक दिव्यांग, असलेल्या दिव्यांग मुलांची तपासणी करून उपचार दिले. यावेळी दिव्यांग मुलांना व्हीलचेअर व सी.पी. चेअर चे वितरण करण्यात आले. शिबीर स्थळी मा. जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे मॅडम यांनी भेट दिली.मुबंईहुन आलेल्या थेरापिस्ट व आयोजकांचे कौतुक व अभिनंदन मॅडमनी केले. या प्रसंगी अधिष्ठाता डॉ समीर जोशी व प्राध्यापक वृंद, संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह डॉ योगेश निटूरकर, मुख्याध्यापिका सौ. दिपाताई पाटील, भौतिक उपचार तज्ञ डॉ मयुरी बिल्लावार, डॉ श्रेयस कुलकर्णी, वाचा व भाषा उपचार तज्ञ डॉ रतन जाधव, समुपदेशक श्री नितीन कुमार आळंदकर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे बहुउद्देशीय पुनर्वसन कार्यकर्ता श्री बस्वराज पैके, मानसोपचार तज्ञ श्री नवाज शेख, विशेष शिक्षक श्री बाळासाहेब गंगणे, श्री सचिन राऊत, श्री योगेश्वर बुरांडे, विशेष शिक्षका सौ. जयश्री माने, सौ प्रणिता दबडगावकर, कु. शितल पाटोळे, दिव्यांग व्यक्तींचे पालक एम.एस.डब्लू. बी.एस.डब्लू चे विद्यार्थी उपस्थित होते.