राष्ट्रीय स्वच्छता अभियान दिवसानिमित्त वि. दे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर यांच्या वतीने सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल परिसरातील स्वच्छता करण्यात आली
राष्ट्रीय स्वच्छता अभियान दिवसानिमित्त वि. दे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर यांच्या वतीने सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल परिसरातील स्वच्छता करण्यात आली
दिनांक ०१/१०/२०२३ रविवार रोजी *राष्ट्रीय स्वच्छता अभियान दिवसानिमित्त* विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर यांच्या वतीने सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल परिसरातील स्वच्छता करण्यात आली. यावेळी संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह डॉ. योगेशजी निटूरकर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे बहुउद्देशीय पुनर्वसन कार्यकर्ता श्री बसवराज पैके, विशेष शिक्षक श्री बाळासाहेब गंगणे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे एम. एस.डब्ल्यू. चे प्रथम वर्षाचे विद्यार्थी, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे बी.एस.डब्ल्यू. चे प्रथम वर्षाचे विद्यार्थी यांनी मोठ्या आनंदाने सहभागी होऊन परिसरातील स्वच्छता केली. यावेळी श्री हनुमंत शिंदे, श्रीमती सरिता कांबळे व श्रीमती अन्नपूर्णा बनछरे यांनी परिश्रम घेतले.
तसेच संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु.)येथेही आज स्वछता अभियान राबवण्यात आले. यामध्ये सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते. सर्वप्रथम महात्मा गांधीजी व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पुजन करून झाली. याप्रसंगी राष्ट्रगीत व स्वच्छतेची शपथ उपस्थित सर्व बंधू-भगिनींनी घेतली तदनंतर संपूर्ण प्रकल्प परिसराची स्वछता करून श्रमदान करण्यात आले.