संवेदना प्रकल्पामध्ये मैत्र फाउंडेशन प्रस्तुत मर्यादांच्या अंगणात वाढताना या पुस्तकाचे लेखक श्री अरुण लोहकरे व सौ. सुजाता लोहकरे यांचे मार्गदर्शन
संवेदना प्रकल्पामध्ये मैत्र फाउंडेशन प्रस्तुत मर्यादांच्या अंगणात वाढताना या पुस्तकाचे लेखक श्री अरुण लोहकरे व सौ. सुजाता लोहकरे यांचे मार्गदर्शन
दि. 16 सप्टेंबर 2023 रोजी संवेदना प्रकल्पामध्ये मैत्र फाउंडेशन प्रस्तुत मर्यादांच्या अंगणात वाढताना या पुस्तकाचे लेखक श्री अरुण लोहकरे व सौ. सुजाता लोहकरे यांचे मार्गदर्शन झाले. यावेळी प्रस्तुत पुस्तकाचे अभिवाचन सौ.सुजाता लोहकरे श्रीमती. विद्या भागवत व कु. सलोनी लोहकरे यांनी केले. वेळी मान्यवरांनी उपस्थित पालकांसोबत हितगुज केले. पालकांना येणाऱ्या अडचणी व त्यावर कशी मात करावे व याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी प्रकल्पाचे कार्यवाह श्री. डॉ. योगेश निटुरकर , प्रकल्पा चे संपर्कप्रमुख .श्री. सुरेश दादा पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दीपा ताई पाटील, जीवन विकास मतिमंद शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक श्री अनिल सर पालक, शिक्षक व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.सत्राचे संचालन विशेष शिक्षिका सौ.जयश्री माने यांनी केले.