जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर चे कार्य कौतुकास्पद आहे. मा.श्री. हसनजी मुश्रीफ (मा.वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र शासन)
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर चे कार्य कौतुकास्पद आहे. मा.श्री. हसनजी मुश्रीफ (मा.वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र शासन)
आज दि. 17 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे मा. मंत्री हसनजी मुश्रीफ यांनी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रास सदिच्छा भेट दिली. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, संवेदना प्रकल्प हे लातूर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत असते. मा. मंत्री महोदयाच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवाचे औचित्य साधून बौद्धिक दिव्यांग मुलांना TLM कीट चे वितरण करण्यात आले. या मध्ये कु. तेजश्री कुलकर्णी, चि पवन कुलकर्णी, कु रेणुका भुतडा यांना प्रातनिधिक स्वरुपात किट चे वितरण करण्यात आले.
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे दिव्यांगासाठीचे कार्य महत्वपुर्ण, श्रेष्ठ असून आपण सर्वतोपरी मदत करण्याचे मनोदय मा. मंत्री महोदयांनी दिले. प्रसंगी केंद्राची माहिती डॉ. योगेश निटूरकर प्रकल्प कार्यवाह यांनी दिली. कार्यक्रमास विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री. डॉ. समीर जोशी, डॉ. श्री. शैलेंद्र चव्हाण, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक, केंद्राच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. वैजनाथ व्हनाळे, श्री. सुरज बाजूळगे, श्री. पारस कोचेटा, श्री. व्यंकट लामजने, श्री योगेश बुरांडे उपस्थित होते.