डीडीआरसी लातूर यांच्यामार्फत संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु.) या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांकरीता नेत्र तपासणी , टीएलएम किट व विविध साधनांचे वितरण संपन्न...
डीडीआरसी लातूर यांच्यामार्फत संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु.) या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांकरीता नेत्र तपासणी , टीएलएम किट व विविध साधनांचे वितरण संपन्न...
दि.29 ऑगस्ट 2023 मंगळवार रोजी राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था, सिकंदराबाद, (सा. न्याय व अ.मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग, भारत सरकार),यांच्या सहकार्यानी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर- संवेदना प्रकल्प, हरंगुळ, (बु) लातूर, समाजकल्याण विभाग, जि.प. लातूर, विवेकानंद हाॅस्पिटल लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धीबाधित दिव्यांग विदयार्थ्यांना विशेष शैक्षणिक TLM (Teaching Learning Material) किटचे वितरण, दिव्यांग विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची नेत्र तपासणी आणि दिव्यांगाना सहाय्यभुत साधनांचे वितरण कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्रीमती वर्षाताई ठाकूर-घुगे, जिल्हाधिकारी लातूर, या होत्या. संवेदना प्रकल्पाच्या वतीने चालणाऱ्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या कार्याचे कौतुक केले . संवेदना प्रकल्पा मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे समाधान वाटत आहे. संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु होणार आहे .त्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, एलेक्ट्रीकॅल, ड्रेस मेकेइंग व कॉम्पुटर ऑपरेटर या विषयासंबंधी लागणारी यंत्र सामुग्री,संस्थेनी उपलब्ध केल्याने दिव्यांगाना रोजगार मिळेल व ते स्वाभिमानाने जगू शकतील. शासनाच्या माध्यमातून कॅम्पस मुलाखती घेऊ असे आश्वासन दिले. शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांचे लेझीम प्रात्यक्षिक खूप प्रेरक होते .
डॉ. राजेशजी पाटील, अध्यक्ष, संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु.) यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये संवेदना प्रकल्पाच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. UDID कार्ड, भ्रमणध्वनी वितरण आणि तपासणी शिबिराचे उद्देश्य सांगितले. जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नदीहत्तरगा येथील दिव्यांग मुलांनी तयार केलेले राखी, पुष्पहार व पेपर कप इ. साहित्याची पाहणी मान्यवरांनी केली. मा. डॉ. वसिमजी अहमद, सहाय्यक प्राध्यापक, राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था, क्षेत्रीय कार्यालय, मुंबई यांनी विशेष शैक्षणिक साहित्याबद्दल माहिती दिली व पालकांनी ह्या साहित्याचा कसा वापर करावयाचा ? याबद्दल मार्गदर्शन केले. श्री. सुरेश बेडके यांनी पालकांशी समन्वय साधला.
विवेकानंद हाॅस्पिटल वतीने विद्यालयातील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. गरजू दिव्यांग बांधवांना साहित्य व महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनी वितरण, सुआश्रय विद्यालयास व्हीलचेअर, सहाय्यभूत साधनांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 133 दिव्यांग विद्यार्थ्यांना TLM किट देण्यात आले. ६६ दिव्यांग विद्यार्थ्यांची व २४ पालकांची नेत्र तपासणी करण्यात आली, या प्रसंगी या कार्यक्रमाला जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. संतोषकुमारजी नाईकवाडी, संवेदना प्रकल्प कार्यवाह डॉ. योगेश निटुरकर, वै. सा. का. श्री. राजू गायकवाड, संवेदना प्रकल्प समितीचे कोषाध्यक्ष श्री पांडुरंग चाफेकर, श्री पुरषोत्तम कर्वा,संपर्क प्रमुख श्री सुरेशदादा पाटील, समिती सदस्य श्री पारस कोचेटा, श्री वैजनाथ व्हनाळे, श्री सत्याप्रेम मुस्ने, श्री सुनिल वसमतकरहोते. उत्साहपूर्ण आनंदाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डीडीआरसीचे श्री.सूरज बाजुळगे यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. सत्यप्रेम मुसने यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता श्री. आदर्श भस्मे यांनी कल्याण मंत्रांनी केली.