दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांच्या हस्ते संवेदना प्रकल्पामध्ये ध्वजारोहण
दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांच्या हस्ते संवेदना प्रकल्पामध्ये ध्वजारोहण
रा. स्व. संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) संचलित, संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह म्हणून डॉ. योगेश धोंडीराज निटूरकर यांची नियुक्ती करण्यात आली.
दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांच्या हस्ते संवेदना प्रकल्पामध्ये ध्वजारोहण करण्यात आले. प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते भारत माता पूजन करण्यात आले.
याप्रसंगी जनकल्याण समिती प्रांताचे संघटन मंत्री श्री. शरदभाऊ खाडिलकर, सहसंघटन मंत्री श्री. परागजी कंगळे, प्रांत सहकार्यवाह श्री. अरुणराव डंके, संघाचे देवगिरी प्रांताचे सद्भाव विभागाचे प्रमुख श्री. सुधाकरराव कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
या सत्राचे प्रास्ताविक, सर्वं मान्यवरांचा परिचय व नूतन सदस्यांचा परिचय श्री. सुरेश दादा पाटील यांनी करून दिला. सत्रामध्ये सांघिक गीत संगीत शिक्षक श्री. योगेश्वर बुरांडे यांच्या सांघिक गीताने झाला. “संवेदना” प्रकल्पाचे नूतन कार्यवाह डॉ. योगेश निटूरकर, कोषाध्यक्ष श्री. पांडुरंग चाफेकर, शालेय समितीच्या अध्यक्षा सौ. चित्रा बजाज, प्रकल्प समितीचे नूतन सदस्य श्री. पुरुषोत्तम करवा, श्री. सुनिल वसमतकर, शालेय समितीचे कोषाध्यक्ष श्री. किशोर भराडिया, डीडीआरसीचे स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य श्री. वैजनाथ व्हनाळे, श्री. सत्यप्रेम मुसने, श्री. पारस कोचेटा, घरोंदा समिती सदस्य श्री. बापू कुंभार यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या सत्रामध्ये डीडीआरसीच्या कार्याचे निवेदन डॉ. योगेश निटूरकर, संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे निवेदन श्री. श्याम भराडीया आणि शालेय कामकाजाची माहिती सौ. दीपाताई पाटील यांनी दिली. डॉ. साताळकर व श्री. शरदभाऊ खाडिलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.