जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद लातूर, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर आणि विवेकानंद मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी अकरा वाजता लातूर जिल्ह्यातील दिव्यांगजणांना ज्यांचा पत्ता न सापडल्याने किंवा चुकीच्या पत्त्यामुळे अथवा घर बदलल्यामुळे UDID कार्ड शासकीय महाविद्यालयात परत येतात अश्या परत आलेले वैश्विक (UDID) कार्ड जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रा मार्फत ४ दिव्यांगजणांना वितरण, तसेच ३ दृष्टी बाधित दिव्यांग विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीचे वितरण करण्यात आले. विवेकानंद मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर लातूरचे चिंतामण परांजपे दृष्टिदान उपक्रमांतर्गत सौ.सुशिलादेवी देशमुख निवासी मुलींचे मूकबधिर विद्यालयातील ८९ विद्यार्थिनींचे नेत्र, ३० जणांची श्रवण व ८९ जणांची दंत तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात संत सूरदास यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेशजी पाटील यांनी केले. दिव्यांगाना शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी UDID कार्डचे असणे आवश्यक असते त्यामुळे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रा मार्फत UDID कार्ड चे वितरण करणे ही विशेष बाब आहे. दिव्यांगाना आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवतात त्यामुळे त्यांची नियमित आरोग्य तपासणी होणे गरजेचे असते. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि विवेकानंद रुग्णालयाचे वतीने नेत्र, श्रवण आणि दंत तपासणी शिबीराचा दिव्यांग विद्यार्थिनींमध्ये नेत्र, श्रवण व दंत विकार असल्यास त्याचे निदान होईल आणि त्यावर उपचार करता येईल असे त्यांनी सांगितले. चिंतामण परांजपे दृष्टिदान उपक्रमांतर्गत नेत्र तपासणी शिबीराबाबतची संकल्पना विवेकानंद रुग्णालयाचे साहय्यक प्रशासकीय अधिकारी डॉ बाजीरावजी जाधव यांनी मांडली. अल्पदृष्टी व अंधत्व निवारणासाठी वेळेच्या आधी जन्म झालेल्या बाळांची नेत्र तपासणी आणि उपचार आवश्यक असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. सामुहिक नेत्र चिकित्सा अंतर्गत विवेकानंद रुग्णालयाने नेत्र तपासणीचे आजचे ५ वे शिबीर असल्याचे सुध्या त्यांनी नमूद केले. श्रवणदोष निदान व वाचा उपचाराबाबतची संकल्पना श्री. रतनजी जाधव यांनी मांडली. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद लातूर यांच्या वतीने अहमदपुर, निलंगा, उदगीर आणि मुरुड या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींचे श्रवणदोष निदान करून त्यांना अत्याधुनिक डिजिटल श्रवण यंत्र वाटप करण्यात आले असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. डॉ. महेशजी देवधर नेत्र विभाग प्रमुख व सदस्य विवेकानंद मेडिकल फाउंडेशन व रिसर्च सेंटर लातूर हे उपस्थित होते. डॉ. महेश देवधर यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपामध्ये चिंतामण परांजपे दृष्टिदान उपक्रम विवेकानंद रुग्णालयामार्फत सुरु झाल्याने रेटीनोपथी ऑफ प्रिम्याचुरीटीचे निदान आणि उपचार झाल्याने अल्पदृष्टी व अंधत्व प्रतिबंधात्मक ठरते. या कार्यक्रमाच्या निमित्याने संवेदना प्रकल्पांतर्गत चालणाऱ्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचा दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती मिळाली असे सांगितले. विवेकानंद रुग्णालयाच्या दंत विभागाच्या डॉ. अर्चनाताई जाजू आणि डॉ. वृषालीताई हदगावकर यांनी दिव्यांग विद्यार्थिनींची दंत तपासणी केली. त्यानंतर डॉ अर्चना जाजू यांनी दाताची काळजी कशी घ्याची यावर एक सत्र घेतले. दंत आरोग्याबाबतच्या सूचना मूकबधीर विद्यार्थिनींना सांकेतिक भाषेत विशेष शिक्षिका सौ.माद्रप एस. जे. यांनी सांगितले. याप्रसंगी संवेदना प्रकल्पाचे सह कार्यवाह डॉ योगेशजी निटूरकर, दिव्यांग लाभार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. बसवेश्वरजी पैके यांनी केले. याप्रसंगी श्री. बसवेश्वरजी पैके यांच्या जन्मदिवसानिमित्य त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आभार प्रदर्शन श्री परमेश्वर जी सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता श्री. अनुपजी दबडगावकर यांनी कल्याण मंत्राने केली. नेत्र तपासणीसाठी श्री. सचिनजी मानकोस्कर, श्री. श्रीकांतजी तुरटवाड, श्रीमती सुवर्णाताई शेटे तसेच संपर्क अधिकारी श्री संतोषजी खटाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी डॉ सचिनजी कुंभार वाचा व श्रवण उपचार तज्ञ यांचे श्रवण तपासणी साठी सहकार्य लाभले. सौ. सुशिलादेवी मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थिनी तसेच विशेष शिक्षिका सौ.इंगळे एस. एन., सौ.शिंदे एस. सि., सौ.काकडे एम. के., सौ.माद्रप एस. जे. आणि विशेष शिक्षक श्री.शिंदे पि.के., श्री.शेख ए.एन तसेच वाचा उपचार तज्ञ श्री.घुले एस. आर. आणि श्री.मळगे एस. व्ही. यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विशेष शिक्षक श्री. बालासाहेब गंगणे व मानसोपचार तज्ञ श्री नवाज शेख यांनी बुद्धीबाधित दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी NIEPID मार्फत निर्मत शैक्षणिक संचाची माहिती सांगितली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डीडीआरसी मधील सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
28/09/2023