बहुविकलांग मुलांचे संदिकर अस्थिशल्य चिकित्सक रूग्णालय, लातूर येथे वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन
बहुविकलांग मुलांचे संदिकर अस्थिशल्य चिकित्सक रूग्णालय, लातूर येथे वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन
दि. 21 एप्रिल 2023 रोजी ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र- संवेदना प्रकल्प लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने सेरेब्रल पाल्सी व बहुविकलांग मुलांचे संदिकर अस्थिशल्य चिकित्सक रूग्णालय, लातूर येथे वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुबंईचे प्रसीद्ध अस्थिशल्य चिकित्सक डाॅ तरल नागदा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुशील अंकाडवार ,डॉ. रोहित राठोड आणि तंत्रज्ञ श्री पवन भट यांनी मुलांची तपासनी केली. यातील कांही विद्यार्थ्यांचे आॅपरेशन ज्युपीटर हाॅस्पीटल ठाणे येथे निशुल्क होणार आहे. या शिबिराचे नियोजन डाॅ श्रीनिवास संदिकर, फिजिओथेरापिस्ट डाॅ मयुरी बिल्लावार, श्री योगेश्वर बुरांडे, प्रणिता क्षिरसागर यांनी केले होते. शिबिराचा आढावा डाॅ राजेश पाटील व देवधर मॅडम यांनी घेतला.