जिल्हा व्यवस्थापन समितीची बैठक मा. जिल्हाधिकारी तथा मा.अध्यक्ष श्री पृथ्वीराज बी.पी. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली
जिल्हा व्यवस्थापन समितीची बैठक मा. जिल्हाधिकारी तथा मा.अध्यक्ष श्री पृथ्वीराज बी.पी. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर या उपक्रमासंबंधातील जिल्हा व्यवस्थापन समितीची बैठक मा. जिल्हाधिकारी तथा मा.अध्यक्ष श्री पृथ्वीराज बी.पी. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 25.11.2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे संपन्न झाली. या बैठकीत जागतिक दिव्यांग दिनानिमीत्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. जिल्हास्तरीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, प्रलंबित युडीआयडी कार्ड चे वितरण, ग्रामीण रुग्णालयात फिट्स येणाऱ्या बौद्धिक दिव्यांग मुलांचे वैद्यकीय तपासणी शिबीर व औषध वितरण, विविध क्षेत्रातील गुणवंत दिव्यांग व्यक्तींचा सन्मान, दिव्यांग विद्यार्थ्यांची रॅली, शासकीय अंध शाळेमध्ये दृष्टीबाधीत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संगीत साहित्य उपलब्ध करुन देणे, दिव्यांग विद्यार्थ्यांना डाटा एंन्ट्री ऑपरेटर प्रशिक्षण या बाबींचे नियोजन करण्यात आले.
या बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. संतोषकुमार नाईकवाडी यांनी केले. बैठकीस जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे, संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह श्री. सुरेश पाटील, सर्व शिक्षा अभियानचे समन्वयक श्री. अंगद महानुरे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्री. आर जी गायकवाड, सहाय्यक सल्लागार श्री. बी एच वाकडे, स्नॅकचे श्री. व्यंकट लामजणे, डीडीआरसीचे श्री. बस्वराज पैके, शासकीय अंध शाळेचे श्री. अमोल निलंगेकर, उमंगचे श्री. किरण उटगे आणि जिल्हा माहिती अधिकारी श्री. युवराज पाटील इ. अधिकारी उपस्थित होते.