गुरुवार दि. 28 जुलै 2022 रोजी संवेदना प्रकल्पामध्ये दीप अमावस्येच्या निमित्ताने दिव्यांग विद्यार्थ्यांनी दीप प्रज्वलन केले. भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशाच्या मानचित्राचे रेखाटन करण्यात आले होते. श्री संतोष मानकुसकर यांनी सुंदर रांगोळी काढली होती. या प्रसंगी शालेय समितीच्या सदस्या सौ. वर्षा सोनटक्के, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.