जिल्हा परिषद नागपुर च्या सभागृहात 'राष्ट्रीय न्यास ' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते
जिल्हा परिषद नागपुर च्या सभागृहात 'राष्ट्रीय न्यास ' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते
SNAC महाराष्ट्र आणि समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 20 जुलै 2022 रोजी जिल्हा परिषद नागपुर च्या सभागृहात 'राष्ट्रीय न्यास ' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी नागपूर जिल्ह्यातील मतिमंद प्रवर्गातील शाळांचे मुख्याध्यापक, बुद्धिबाधीत विषयात कार्य करणाऱ्या विविध संस्थांचे प्रतिनिधी आलेले होते. या प्रसंगी जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री किशोर भोयर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्री प्रल्हाद दांडे, SNAC चे समन्वयक श्री व्यंकट लामजने, सक्षम संस्थेचे केंद्रिय कार्यालयातील श्री स्वपनील झिंगरे उपस्थित होते.