दिव्यांगांकरिता कृत्रिम साधने मोजमाप घेण्याचे शिबीर संपन्न झाले
दिव्यांगांकरिता कृत्रिम साधने मोजमाप घेण्याचे शिबीर संपन्न झाले
वात्सल्य ट्रस्ट मुंबई व संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु) यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 25 मार्च 2022 रोजी दिव्यांगांकरिता कृत्रिम साधने मोजमाप घेण्याचे शिबीर संपन्न झाले. यासाठी मुंबईहून श्री. उमेश राजे (ऑर्थोटिक्स), डॉ. अर्चना चौधरी (ऑक्युपेशनल थेरपीस्ट), डॉ. अभिषेक मोहपात्रा (ऑडीयालॉजीस्ट), डॉ. अंकीत बागवणे (ऑक्युपेशनल थेरपीस्ट), श्री. सिद्धेश नाणे (ऑर्थोटिक्स अँसीस्टंट) हे तज्ञ व्यक्ती आले होते. संवेदना प्रकल्पातील डॉ. मयुरी बिल्लावार (फिजीओथेरपीस्ट) यांनी नियोजन केले. दिव्यांग मुलांच्या पालकांशी विशेष शिक्षक जयश्री माने, प्रणिता क्षीरसागर, योगेश्वर बुरांडे, सचिन राऊत यांनी संपर्क केला.