आता ! ‘महिला’ अबला नाहीत सबला आहेत. – मा. न्यायाधीश कंकणवाडी मँडम
आता ! ‘महिला’ अबला नाहीत सबला आहेत. – मा. न्यायाधीश कंकणवाडी मँडम
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र -संवेदना प्रकल्प लातूर व सक्षम यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 8 मार्च 2021 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरुन मा. एस. डी. कंकणवडी (मा न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर) बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. अनेक उच्च पदावरती महिला कार्यरत आहेत. यासाठी सर्व महिलांनी वर्तमान शिक्षणाचा उपयोग करुन घ्यावा, संघर्ष हा सगळ्यांच्याच आयुष्यात असतो अपंग किंवा दिव्यांग पण आपण ह्यावर प्रकाश टाकला पाहिजे व आयुष्य हसत खेळत जगणे हे मनाला आनंद देणारे आहे. स्री पुरुष समानता बऱ्यापैकी समानता झाली आहे, फक्त सजगता पाहिजे. न्यायपालिकेमध्ये एक दिवस दिव्यांगासांठी हा उपक्रम आम्ही सुरु केला आहे. यामध्ये ज्या दिव्यांगांच्या समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही न्यायपालिकेत आमंत्रित करतो. आम्हाला मतिमंद प्रवर्गाच्या शाळांना भेटी देणे, शाळेची तपासणी करणे हा आमच्या कामतील एक भाग आहे. मी आजपर्यंत अनेक शाळा पाहिल्या आहेत, संवेदना बहुविकलांग मुलांची शाळेसारखी उत्कृष्ठता मला पहायला मिळाली नाही. संवेदना शाळेबद्दल गौरव उदगार काढले.
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातू मार्फत जागतिक महिला दिनाचा कार्याक्रम दिव्यांग विषयाकरिता आयोजित केला त्याबद्दल जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे मी
अभिनंदन
करते. पोलीस विभागात अधिकारी पदावर काम करीत असताना अनेक महिलांवरती अत्याचार आणि अन्याय झालेल्या पिडीतांना मी जवळून पाहिले आहे. ग्रामीण भागातील दिव्यांग मुली, महिलांवरती अन्याय होवू नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. मला या ठिकाणी आज बोलावले त्याबद्दल मी संस्थेचे आभार व्यक्त करते. असे मत पोलीस उपाधीक्षिका प्रिया पाटील यांनी विषद केले.
आजच्या दिनाचे औचित्य साधून डॉ अमृता पाटील (स्त्री रोग तज्ञ, विवेकानंद हॉस्पिटल) यांनी स्त्रियांना वारंवार होणाऱ्या आजारांवर, त्यावरचे निदान, उपचार व आहार ह्यावर मार्गदर्शन केले.
महिलांना स्वतः साठी वेळ काढून विरंगुळा व्हावा म्हणून संवेदना प्रकल्प सदस्या अश्विनी लातुरे यांनी विविध खेळ घेतले. महिलांना त्यांच्या दिव्यांगत्वाची व आपल्या दिव्यांग मुलांची काळजीमुळे व्यस्तता असते खेळांमुळे त्यांना थोडासा विरंगुळा मिळाला.
शाहू महाविद्यालयातील दिव्यांग प्राध्यापिका प्रीती पोहेकर यांची मुलाखत ऑडीऑलॉजीस्ट सौ. सपना डाके यांनी घेतली. दिव्यांगत्वावर मात करत यश संपादन कसं करायचं यावरती मुलाखतीद्वारे मार्गदर्शन केले. दिव्यांग महिलांच्या कथा व व्यथा ह्यावर प्रकाश टाकला. समाजाचा दिव्यांगजनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संवेदना प्रकल्पाच्या मुख्याध्यापिका सौ. दीपा पाटील यांनी केले तर सूत्र संचालन ऑडीऑलॉजीस्ट सौ. सपना डाके व विशेष शिक्षिका सौ. जयश्री माने यांनी केले. पालक सौ. अनामिका कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले.
स्वागत गीत संवेदना शाळेतील विद्यार्थिनी राधिका पाठक, वैष्णवी गोणे व संगीत शिक्षक योगेश्वर बुरांडे यांनी सादर केले.