संवेदना प्रकल्प, टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज, नायर हॉस्पिटल मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने संवेदना प्रकल्प लातूर येथे ऑक्युपेशनल थेरपी चे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
संवेदना प्रकल्प, टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज, नायर हॉस्पिटल मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने संवेदना प्रकल्प लातूर येथे ऑक्युपेशनल थेरपी चे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
संवेदना प्रकल्प, टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज, नायर हॉस्पिटल मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 18,19 ऑगस्ट 2021 रोजी संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु.) लातूर येथे ऑक्युपेशनल थेरपी चे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. उद्गघाटन न्युरोफिजियन डॉ. निलेश नागरगोजे यांनी केले . या प्रसंगी त्यांनी पालकांना संबोधित करताना म्हणाले की, ऑटीझम, बहुविकलांग, बालकांना ऑक्युपेशन थेरापी महत्त्वपूर्ण आहे. लातूर च्या परिसरात ऑक्युपेशन थेरापीस्ट ची अत्यंत गरज आहे . संवेदना प्रकल्पांनी मुंबई सारख्या नामांकीत नायर हॉस्पिटलमधील तज्ञांना या ठिकाणी निमंत्रित करुन पालकांना या विषयी माहिती देणे , बालकांची थेरेपी घेणे ही बाब कौतुकाची आहे. सर्व पालकांनी हा विषय समजून घ्यावा . ही थेरपी आपल्या घरी नियमित घ्यावी .या वेळी शिबीराचे महत्व , विषयाची व्याप्ती प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी व्यक्त केले. नॅशनल मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉ. हर्ष जहागिरदार हे म्हणाले की, संवेदना प्रकल्पामध्ये आम्ही 2014 पासून येत आहोत. करोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षात यायला जमले नाही . या ठिकाणी सातत्याने गुणवत्तापूर्ण जी थेरेपी दिली जाते ते महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी अनेक दिव्यांग मुले ग्रामीण भागातून येतात ते फार विशेष वाटते व त्यांच्यासाठी स्वतंत्र थेरपी कॅम्प अन्य भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत. जनकल्याण समिती ची निःशुल्क सेवा हे एक वैशिष्ट्य आहे . थेरपी कॅम्प साठी मुंबईहून डॉ. ज्योती जाधव, डॉ दीपाली शिंदे, डॉ यशवी पतिया यांनी सर्व मुलांची तपासणी, थेरपी व पालकांचे समुपदेशन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ. मयुरी बिल्लावार आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दीपा पाटील यांनी आभार व्यक्त केले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी निकिता फड, जयश्री माने, सचिन राऊत, शिवाजी चौरे, योगेश्वर बुरांडे यांनी प्रयत्न केले .