दिव्यांग मुलांनी डॉक्टरांना राखी बांधून साजरे केले रक्षाबंधन....
दिव्यांग मुलांनी डॉक्टरांना राखी बांधून साजरे केले रक्षाबंधन....
संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र, हरंगुळ (बु), सक्षम, लातूर व जनकल्याण निवासी विद्यालय, हरंगुळ (बु) यांच्या वतीने दिव्यांग विद्यार्थी व सामान्य विद्यार्थ्यांकरिता आज दि. 22 ऑगस्ट 2021 रोजी रक्षांबधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास सक्षमचे संघटनमंत्री डॉ. सुकुमारजी, हैद्राबाद येथील न्युरोसर्जन डॉ. विजयसारथी, आर्थोपेडीक सर्जन श्री. वेदप्रकाशजी, डॉ. संतोषजी, जनकल्याण समितीचे संघटनमंत्री श्री. शरदभाऊ खाडिलकर, संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील, कार्यवाह श्री. सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्रातील दोन दिव्यांग विद्यार्थिनी कु. राधिका पाठक (इयत्ता दहावी 86 %) व कु. वैष्णवी गोणे (इयत्ता दहावी 84 %) गुण प्राप्त केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते दोघींचा सत्कार करण्यात आला. रक्षाबंधनाचे महत्व डॉ. संतोष, हैद्राबाद येथील विषद केले. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सक्षमचे डॉ. सुकुमारजी यांनी संवेदना प्रकल्प व जनकल्याण विद्यालयाच्या कार्याबद्दल कौतुक केले. त्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यीनीनी सर्व डॉक्टर मंडळीना राखी बांधल्या. तसेच जनकल्याण निवासी विद्यालयाच्या इयत्ता 8, 9 व 10 वीच्या विद्यार्थीनींनी दिव्यांग विद्यार्थ्यांना राखी बांधल्या व राखी पौर्णीमा साजरी केली. प्रसंगी दिव्यांग विद्यार्थीनी कु राधिका पाठक हिने भावना व्यक्त केल्या की, मी दिव्यांगत्वावर मात करुन यश संपादन केले आहे. तसेच यश आपण सामान्य विद्यार्थ्यांनीही करावे व खुप मोठे व्हावे. आज आपल्या समोर बोलता आले खुप आनंद वाटला. तसेच पुढे संगणक अभियंता होण्याचे स्वप्न असल्याचे सांगीतले. कार्यक्रमास सक्षम संस्थेचे विविध राज्यातून आलेले प्रतिनिधी, संवेदना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दीपा पाटील, जनकल्याण विद्यालयाच्या अधीक्षिका शर्मिष्ठा कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी श्री. रवि पुर्णपात्रे, व्यवस्थापक श्री. बाहुबली भस्मे यांच्यासह विशेष शिक्षक श्री. व्यंकट लामजणे, योगेश्वर बुरांडे, पर्यवेक्षक श्री. दत्ता माने, कदरे, सुर्यवंशी,विद्या कुलकर्णी, संवेदना व जनकल्याण विद्यालयातील विद्यार्थी उपस्थितीत होते.