जागतिक दिव्यांग दिनानिमीत्त तालुकाश: शिबीराचे आयोजन
जागतिक दिव्यांग दिनानिमीत्त तालुकाश: शिबीराचे आयोजन
जागतिक दिव्यांग दिनानिमीत्त
तालुकाश: शिबीराचे आयोजन
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, मुरुड यांच्या संयुक्त विद्यमाने शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरामध्ये लातूर जिल्ह्यातील पूर्व प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या दिव्यांगांना युडीआयडी कार्ड काढणे, विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी हे आवश्यक आहे. बौद्धिक दृष्ट्या दिव्यांगांकरिता निरामय आरोग्य विमा योजनेचे कार्ड काढणे व विमा योजनेचा लाभ प्राप्त करुन घेण्याची माहिती या शिबीरात देण्यात येत आहे. हे शिबीर दि. 22 नोव्हेंबर 2021 ते 5 डिसेंबर 2021 पर्यंत चालणार आहे.
दि. 22 नोव्हेंबर – अहमदपूर, 23 नोव्हेंबर - औसा, 24 नोव्हेंबर -चाकूर, 25 नोव्हेंबर -देवणी, 26 नोव्हेंबर -लातूर, 29 नोव्हेंबर -जळकोट, 30 नोव्हेंबर -निलंगा, 1 डिसेंबर – शिरुर अनंतपाळ, 2 डिसेंबर- रेणापूर व जागतिक दिव्यांग दिनी दि. 3 डिसेंबर रोजी होणार आहे.
शिबीराचा लाभ घेण्याकरिता संबंधीत तालुक्याच्या गटसाधन केंद्राशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूरच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी श्री. बस्वराज पैके – 9405350608, व श्री. आदर्श भस्मे – 8080405278 यांना संपर्क करावे.