शनिवार दि. 4 जुलै 2020 रोजी लातूर मध्ये कोवीड 19 केअर सेंटरमधून एक दिव्यांग मुलगा 10 दिवस यशस्वीपणे उपचार घेवून पालकांसोबत घरी निघाला. त्याच्यावरती वैद्यकीय प्रशासनाने उत्तम उपचार केले. दिव्यांग मुलांची विशेष काळजी घेण्यात आली. आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसारचा काढा, फळे, ड्रायफ्रुटस, उपयुक्त आहार कोवीड केअर सेंटरमधून देण्यात आले. त्याकरिता संवेदना प्रकल्प आणि सक्षम देवगिरी प्रांत यांच्याकडून दिव्यांग मुलांचा व त्याच्या पालकावरती पुष्पवृष्टी करण्यात आली.
कोवीड केअर सेंटर मध्ये अथक परिश्रम करणाऱ्या डॉक्टरांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. डॉ. माधव शिंदे (निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय), डॉ. खान मँडम, डॉ. सुनिता पाटील, डॉ. संदिप राजहंस, डॉ. लक्ष्मण देशमुख, डॉ. सुचिता काळे, नर्सिंग स्टाफ, वसतिगृह अधिक्षिका (समाजकल्याण विभाग) चौधरी मँडम यांचा सत्कार करण्यात आला. या डॉक्टर मंडळींचे श्रेष्ठ कार्य असल्याची भावना पेशंटच्या नातेवाईंकामध्ये निर्माण झालेली आहे. विशेष म्हणजे दिव्यांग मुलगा सलग 10 दिवस व्यवस्थीत उपचार घ्यावा म्हणून मुलासाठी कँरम बोर्डची व्यवस्था करण्यात आली होती.