संवेदना प्रकल्प आयोजित व राष्ट्रीय न्यास प्रायोजित "स्व वकालत" या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
संवेदना प्रकल्प आयोजित व राष्ट्रीय न्यास प्रायोजित "स्व वकालत" या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
दि.9,10 सप्टेंबर 2023 रोजी संवेदना प्रकल्प आयोजित व राष्ट्रीय न्यास प्रायोजित "स्व वकालत" या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन विशेष शिक्षक, पालक, दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी घरोंदा नदिहात्तरगा जि.लातुर येथे आयोजित करण्यात आले होते. विषयाचे मार्गदर्शक श्रीमती रेखा ग्रेस मॅडम मुंबई, श्री अभय दिवे नागपुर, मा.जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री संतोष नाईकवाडी, व श्री सुरेशदादा पाटील होते.प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालन विशेष शिक्षिका सौ. जयश्री माने मॅडम यांनी केले.विशेष शिक्षक श्री शिवाजी चौरे यांनी आभार व्यक्त केले. प्रामुख्याने दिव्यांग व्यक्तींना गरज असेल तेव्हांच मदत, त्यांच्या गरजेनुसार मदत, दिव्यांग व्यक्तींच्या भावना जाणुन घेतल्यावरच त्यानुसार योजनांचा विचार करणे, आत्मप्रतिष्ठेला पाठींबा दिला पाहिजे, या साठी जी चळवळ चालु आहे त्यावरती समाजांनी विश्वास ठेवायला हवे. बौद्धीक दृष्ट्या दिव्यांगाचे हक्क मिळवुन देण्यासाठी समाजानी सोबत राहिले पाहिजे.दिव्यांग व्यक्तीवर मालक म्हणुन कोणी हक्क गाजवु नये . या विषयावर कार्यशाळेत मांडणी व चर्चा झाली.