जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नदी हत्तरगा ता.निलंगा येथे दिव्यांग व्यक्तींची मोफत वैद्यकीय तपासणी, उपचार शिबीर संपन्न झाले.
जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नदी हत्तरगा ता.निलंगा येथे दिव्यांग व्यक्तींची मोफत वैद्यकीय तपासणी, उपचार शिबीर संपन्न झाले.
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर, एम आय एम एस आर वैद्यकीय महाविद्यालय, सक्षम देवगिरी प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नदी हत्तरगा ता.निलंगा (किल्लारी स सा कारखान्याच्या मागे) येथे दिव्यांग व्यक्तींची मोफत वैद्यकीय तपासणी, उपचार शिबीर संपन्न झाले. किल्लारी व ग्रामीण भागातील दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी रविवार दि. 8 डिसेंबर 2019 रोजी झाले. यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय (एम आय एम एस आर वैद्यकीय महाविद्यालय) चे फिजीशियन डॉ. अश्विन मानकोस्कर, डॉ. गौरव कदम, दंतचिकीत्सक, फिजीओथेरपीस्ट, फार्मासिस्ट, सौ. आळंदकर सामाजिक कार्यकर्त्या यांचे सहकार्य लाभले.
संवेदना प्रकल्पाचे फिजीओथेरपीस्ट डॉ. सुरेशकुमार, डॉ. मयुरी बिल्लावार, स्पीच थेरपीस्ट श्रीमती सपना डाके, क्लिनीकल सायकॉलॉजीस्ट श्री. आळंदकर यांनी दिव्यांग व्यक्तींची थेरपी व पालकांचे समुपदेशन केले.
ग्रामीण भागातील अत्यंत गरजू दिव्यांग व्यक्तींची संख्या अधिक होती. या वैद्यकीय तपासणी शिबीराला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विपीणजी इटणकर यांनी जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील दिव्यांग व्यक्ती चालवित असलेल्या पेपर कप मशीनची पाहणी केली.
श्री. वसंतराव पांचाळ, श्री. रत्नदीप बोटवे, श्री. व्यंकट लामजणे, श्री. शिवाजी चौरे, कु. प्रणिता क्षीरसागर,कु. प्रतिक्षा क्षीरसागर, सौ. दीपाली देशमुख व पालक यांनी शिबीराच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. दिव्यांगांची नोंदणी श्री. बस्वराज पैके यांनी केली तर ग्रामीण भागातील दिव्यांगांच्या प्रत्यक्ष भेटी श्री. सचिन जाधवर, श्री. ज्ञानेश्वर खोबरे, श्री. रवि खुंटेवाड यांनी घेतल्या.