दिव्यांग मुलांची व पालकांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आलेले अस्थिशल्य चिकित्सक डॉ. श्रीनिवास संदीकर, दंत चिकित्सक डॉ. अक्षय गिल्डा, त्वचा रोगतज्ञ डॉ. गौरव सोमाणी, स्त्रीरोग तज्ञ डॉ. अमृता पाटील यांनी पालकांचे समुपदेशन केले.
प्रशिक्षणाचा समारोप न्युरोफिजिशियन डॉ. देवाशिष रुईकर यांनी केला. सेरेब्रल पाल्सी, आत्ममग्न, बहुविकलांग, मतिमंद यांचे वर्गीकरण केले, ही होण्याची कारणे, उपाय आणि थेरपीचे महत्व विषद केले. मुलांना सांभाळताना स्वत:वर अन्याय करु नका. दिव्यांग मुलांचे मुल्यांकन करुन त्याची क्षमता व मर्यादा ओळखून थेरपी व त्यांच्या शिक्षणाची योजना करावी.
या वेळी प्रशिक्षणार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रकल्पाचा उद्देश, प्रकल्पात चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती व तिचे महत्व प्रकल्प कार्यवाह श्री सुरेश पाटील यांनी सांगीतले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. रमेशराव जोशी उपस्थित होते.