जागतिक दिव्यांग (अपंग)दिना निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
जागतिक दिव्यांग (अपंग)दिना निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
नदी हत्तरगा येथील जनकल्याण दिव्यांग केंद्रात अपंग दिन साजरा दिनांक ०३/१२/२०१८-रोज सोमवारी सकाळी ठीक ११.००वाजता जागतिक दिव्यांग (अपंग)दिना निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या वेळी प्रमुख पाहुणे मा.उपविभागीय अधिकारी निलंगा श्री विकास जी माने , मा. तहसीलदार श्री विक्रम जी देशमुख संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह श्री सुरेश पाटील महाराष्ट्र उच्च माध्यमिक किल्लारी चे प्राचार्य श्री सतिष भोसले व किल्लारीचे उपसरपंच डॉ. अशोक पोतदार हे होते . सर्व मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींना भारत सरकारच्या अलिम्को कंपणी कडून साहित्य वितरण, दिव्यांग मतदारांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री रत्नदीप बोटवे, श्री बसवराज पैके, किल्लारी येथील व्यापारी , नदी हात्तरगा येथील ग्रामस्थ परिसरातील दिव्यांग व्यक्ती व प्रकल्पातील कर्मचारी उपस्थित होते.
सुत्रसंचालन श्री शंकर जाधव यांनी तर आभार श्री सचिन जाधवर यांनी केले.