जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नदीहत्तरगा येथे 'कुटुंब प्रबोधन' या विषयावर स्नेह मेळावा संपन्न
जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नदीहत्तरगा येथे 'कुटुंब प्रबोधन' या विषयावर स्नेह मेळावा संपन्न
शनिवार दि. 20 जानेवारी 2018 जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नदीहत्तरगा येथे 'कुटुंब प्रबोधन' या विषयावर स्नेह मेळावा संपन्न झाला. हळदी- कुंकू या निमित्ताने 15 गावातील 215 महिलांनी भाग घेतला. यावेळी जनकल्याण समितीच्या संभाग उपाध्यक्षा सौ. सीमा अयाचित यांनी 'कुटुंब प्रबोधन' या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी सौ. गीता आवटे, सौ. नागदा व सौ. वैशाली दुधनी यांनी महिलांना मनोरंजनातून प्रबोधन, हे उपक्रम घेतले. सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशन, रेणुका कलेक्शन यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे आयोजन जयक्रांती इंग्लिश स्कूल व जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्रांनी केले होते.