दिनांक 23 ऑगस्ट 23 बुधवार रोजी मौजे उदगीर येथील श्री आर्षदजी हमीदसाब बागवान यांनी श्री बस्वराजजी पैके (बहुउद्देशीय पुनर्वास कर्मचारी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर) यांना संपर्क साधून *मी दिव्यांग आहे, माझे दिव्यांग सहाय्यक साधन (कुबड्या) खराब झाले आहेत मला उठून फिरता येत नाही, मला सहाय्यक साधनाची आवश्यकता आहे* असे सांगितले. या दिव्यांग लाभार्थ्याची अडचण लक्षात आल्यावर जिल्हा दिव्यांग पुनर्वसनचे उपकेंद्र व उदगीर सक्षम दिव्यांग सेवा केंद्र चे अध्यक्ष श्री शंकरआप्पा लासुणेजी यांच्या हस्ते श्री बागवनजी यांना दिव्यांग सहाय्यक साधन देण्यात आले. यावेळी श्री विनोदजी तेलंगे, श्री रविकिरण बेळकुंदे, श्री बंडेप्पा पडसलगे, श्री किरणजी नेमट यांच्या उपस्थितीत साहित्य देण्यात आले.
श्री बागवनजी व त्यांच्या कुटुंबीयांनी सक्षम दिव्यांग सेवा केंद्र व जिल्हा दिव्यांग पुर्नवसन उपकेंद्र यांचे आभार मानले..