डीडीआरसी लातूर या ठिकाणी नेत्र-दंत-श्रवण तपासणी व श्रवण यंत्र, भ्रमणध्वनी वितरण संपन्न.
डीडीआरसी लातूर या ठिकाणी नेत्र-दंत-श्रवण तपासणी व श्रवण यंत्र, भ्रमणध्वनी वितरण संपन्न.
दि. 11 ऑगस्ट 2023 शुक्रवार रोजी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद लातूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर आणि विवेकानंद मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने डीडीआरसी लातूर या कार्यालयाच्या ठिकाणी दिव्यांगजणांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. विवेकानंद मेडिकल फाउंडेशन व रिसर्च सेंटर लातूरच्या वतीने सुशिलादेवी देशमुख निवासी मुलींचे मूकबधिर विद्यालय व सुआश्रय निवासी अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यांची नेत्र, दंत व श्रवण तपासणी करण्यात आली. तसेच गरजू दिव्यांग बांधवांना श्रवण यंत्र, महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनी वितरण, व्हीलचेअर, साहाय्यभूत साधनांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा शीघ्र निदान केंद्र, लातूर यांना विशेष शैक्षणिक साहित्य टीचिंग लर्निंग मटेरियल (TLM) किट देण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. श्री. अनमोलजी सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद लातूर यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपामध्ये संवेदना प्रकल्पाच्या वतीने चालणाऱ्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या कार्यचे कौतुक केले आणि समाजकल्याण विभाग मार्फत दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यासाठी साह्याता करू असे आश्वासन दिले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सौ. अरुणा देवधर, वैद्यकीय संचालिका विवेकानंद मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर लातूर यांनी नेत्र तपासणी आणि उपचार हे अल्पदृष्टी व अंधत्व प्रतिबंधात्मक उपाय ठरतात त्यामुळे अश्या शिबिराचे आयोजन म्हत्वाचे असल्याचे नमूद केले. तसेच दृष्टिदान उपक्रम विवेकानंद रुग्णालयामार्फत सुरु झाल्याने रेटीनोपथी ऑफ प्रिम्याचुरीटीचे निदान आणि उपचार झाल्याने अल्पदृष्टी व अंधत्व प्रतिबंधात्मक ठरते.. डॉ. राजेशजी पाटील, अध्यक्ष, संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु.) यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये संवेदना कल्पाच्या विविध उपक्रमाची माहिती दिले UDID कार्ड, भ्रमणध्वनी वितरण आणि तपासणी शिबिराचे उद्देश्य सांगितले. श्री. सुरेशदादा पाटील, कार्यवाह संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु.), यांनी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या कार्याची माहिती दिली. दंत चिकित्सक डॉ. वृषालीताई हदगावकर आणि श्रवण व वाचा उपचार तज्ञ डॉ रतन जाधव यांनी दंत आणि श्रवण शिबिराची संकल्पना मांडली. एस. व्ही. एस. एस. फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वीरेंद्र मेश्राम, डॉ. प्रतिक मेश्राम, डॉ. दिपाली जाधव आणि विद्यार्थी उपस्थित होते. फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने दिव्यांग मुलांची फिजिओथेरपी सत्र घेण्यात आले. तसेच जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नदीहत्तरगा येथील दिव्यांग मुलांनी तयार केलेले राखी, पुष्पहार व पेपर कप इ. साहित्याची पाहणी मान्यवरांनी केली. ३ दृष्टीबाधित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनी, ६ श्रवण यंत्र, १ चाकाची खुर्ची, १ TLM कीट, १ साह्यभूत साधन तसेच ३२ विद्यार्थ्यांची नेत्र, २० जणांची श्रवण व ३२ जणांची दंत तपासणी करण्यात आली, व २० विद्यार्थ्यांचे फिजिओथेरपी सत्र घेण्यात आले. या प्रसंगी या कार्यक्रमाला श्री. संतोषकुमारजी नाईकवाडी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी लातूर, श्री. अरुणराव डंके सहकार्यवाह, रा. स्व. संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत),, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे कार्यवाह डॉ.योगेश निटुरकर, वै. सा. का. श्री. राजू गायकवाड, सहाय्यक सल्लागार.श्री. बाळासाहेब वाकडे, मानोसपचार तज्ञ श्री. नितीनकुमार आळंदकर, श्री. बसवराज पैके, फिजिओथेरपीस्ट श्री. श्रेयस कुलकर्णी, श्री श्रीरामजी शिंदे, श्री मुस्ने, श्री. वैजिनाथ व्हणाले,, विवेकानंद रूग्णाल्यातील दंतरोग तज्ञ , परिचारिका सौ. सावंत, सौ. गोपिकाताई सौदागर, श्री श्रीकांतजी तुरटवाड, श्रीमती सुवर्णाताई शेटे, सौ. सुशीलादेवी देशमुख निवासी मुलींचे मूकबधिर विद्यालयाचे सर्व शिक्षक तसेच सुआश्रय निवासी अपंग विद्यालयाचे सर्व शिक्षक, दिव्यांग विद्यार्थी, लाभार्थी, तसेच विशेष शिक्षिका सौ. इंगळे एस. एन., सौ. शिंदे एस. सि., सौ.काकडे एम. के., सौ.माद्रप एस. जे. आणि विशेष शिक्षक श्री येलमटे, श्री कुकाले, श्री.शिंदे पि.के., श्री.शेख ए.एन तसेच वाचा उपचार तज्ञ श्री.घुले एस. आर. आणि श्री.मळगे एस. व्ही. यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अत्यंत उत्साहपूर्ण आनंदाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. संबधित कार्यक्रम सूत्रसंचालन डीडीआरसीचे श्री. परमेश्वर सोनवणे यांनी केले. आभार प्रदर्शन मानोसपचार तज्ञ श्री. नवाजजी शेख यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता श्री. अनुप दबडगावकर यांनी कल्याण मंत्रांनी केली.