दि. 29 जुलै 2023 रोजी संवेदना प्रकल्पामध्ये डॉ. आशिष हनुमंतराव चेपुरे व सौ अपूर्वा आशिष चेपुरे यांनी संवेदना प्रकल्पातील 12 ते 18 वयोगटातील विशेष गरजा असलेल्या मुले - मुली व त्यांचे पालक यांना मुलांच्या वाढत्या वयाबरोबर त्यांच्यामध्ये होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलाला पालकांनी कसे सामोरे जायचे व त्यामध्ये येणाऱ्या अडचणींना कशाप्रकारे उपाय योजना करायच्या व याचबरोबर या वयामध्ये मुलांचे व मुलींचे मानसिक आरोग्य कशा प्रकारे सांभाळायचे या विषयावर मार्गदर्शन केले. या सत्रा मध्ये संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह मा. श्री. सुरेशदादा पाटील मुख्याध्यापिका सौ. दीपाताई पाटील ,शालेय समिती सदस्य व कान, नाक, घसा तज्ञ डॉ. शितल शेळके उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फ़िजिओथेरपिस्ट डॉ. मयुरी बिल्लावार मॅडम यांनी केले व उपस्थित सर्वांचे आभार संवेदना प्रकल्पातील पालक प्रा. डॉ. संध्या कोल्हे यांनी मानले. या कार्यक्रमास प्रकल्पातील विशेष शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.