जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामध्ये हेलन केलर जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामध्ये हेलन केलर जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर येथे अंध प्रवर्गातील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या 22 विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाईल चे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अभिनव गोयल यांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांना हे मोबाईल देण्यात आले. या प्रसंगी विवेकानंद रुग्णालयाच्या वतीने दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणी व उपचार करण्यात आले. विशेष बाब म्हणजे आजच मराठवाड्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पहिली कॉकलिअर इम्प्लांट ची सर्जरी अधिष्ठाता इ.एन.टी. सर्जन डॉ. समीर जोशी यांनी येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शस्त्रक्रिया केली. या कार्यक्रमात संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह श्री. सुरेश पाटील नेत्रचिकित्सक डॉ.गोसावी, डॉ. मयूर कुलकर्णी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. संतोष नाईकवाडी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. योगेश निटूरकर यांनी केले. हेलन केलर यांचे जीवन चरित्र श्री. बस्वराज पैके यांनी विगत केले. विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी व उपचार याची माहिती डॉ. गौरी कुलकर्णी यांनी सांगितली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. परमेश्वर सोनवणे यांनी केले या कार्यक्रमासाठी श्री. व्यंकट लामजणे, विवेकानंद रुग्णालयाचे डॉ. राधेश्याम कुलकर्णी व दिव्यांग शाळेतील विशेष शिक्षक उपस्थित होते. मानसोपचार तज्ञ श्री. नवाज शेख यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली