जागतिक सिकल सेल दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
जागतिक सिकल सेल दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
रा. स्व. संघ जनकल्याण समिती(महाराष्ट्र प्रांत) संचलित संवेदना प्रकल्प हरंगुळ(बु),लातूर व डॉ. भालचंद्र ब्लड बँक, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने 19 जून, जागतिक सिकल सेल दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत करण्यात आले होते, रक्तदान शिबिराची सुरुवात ऋषी अष्टावक्र यांच्या प्रतिमेचे पूजन,पुष्पहार अर्पण करून ज्येष्ठ बालरोग तज्ञ, संवेदना प्रकल्पाचे माजी अध्यक्ष डॉ.मन्मथ भातांब्रे यांनी केली. एकूण 15 व्यक्तींनी या शिबिरामध्ये रक्तदान केले. विशेष बाब म्हणजे दिव्यांग व्यक्ती, दिव्यांग व्यक्तींचे पालक, दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींनी रक्तबाधित दिव्यांगांसाठी रक्तदान करून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतोत हा संदेश सर्वांना दिला. अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हे रक्तदान शिबीर संपन्न झाले