डीडीआरसी लातूर मार्फत दिव्यांग व्यक्तींना युडीआयडी कार्डचे वितरण
डीडीआरसी लातूर मार्फत दिव्यांग व्यक्तींना युडीआयडी कार्डचे वितरण
दिनांक 25 मे 2023 वार-गुरुवार रोजी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने ज्या दिव्यांग बांधवांचे युडीआयडी कार्ड मिळत नव्हते अशांचे युडीआयडी कार्ड जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर यांनी मिळवून दिव्यांग बांधवांना वाटप केले. हे वैश्विक कार्ड नसल्याने दिव्यांग बांधव शासकीय योजनेपासून वंचित राहत होते, कारण कोणतीही शासकीय योजना घेतेवेळी वैश्विक कार्ड म्हणजेच युडी आयडी कार्ड आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन हा वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. संतोषजी नाईकवाडी, वैसाका श्री. राजू गायकवाड, सहाय्यक सल्लागार श्री.बाळासाहेब वाकडे, डीडीआरसीचे श्री.बसवराज पैके, श्री. परमेश्वर सोनवणे, मानसोपचार तज्ञ नवाज शेख , विषय शिक्षक श्री. बालासाहेब गंगणे, कर्मचारी व दिव्यांग व्यक्ती व त्यांचे पालक उपस्थित होते. अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा युडीआयडी कार्ड वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
*आपले-*
*जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर*
*अंमलबजावणी अभिकर्ता - रा. स्व. संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) संचलित, संवेदना प्रकल्प, लातूर*