स्नॅक महाराष्ट्र, समाज कल्याण विभाग जि. प. लातूर, डीडीआरसी लातूर, यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 21 मार्च 2023 रोजी लातूर येथे जागतिक डाऊन सिंड्रोम दिन साजरा करण्यात आला.
जिल्हा क्रीडा संकुल येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जि. प. येथे विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांची शाळा, जीवन विकास प्रतिष्ठान, संवेदना बहुविकलांग मुलांची शाळा, संत बापुदेव साधू निवासी मतिमंद विद्यालय, कै. वसंतराव काळे होमिओपॅथी महाविद्यालयाचे विद्यार्थी, श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे फिजिओथेरपी महाविद्यालय सहभागी झाले होते.
रॅली प्रारंभ क्रीडा संकुल येथील शहीद स्मारकास डाउन सिंड्रोमच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले डीडीआरसी चे श्री. श्याम भराडिया वै.शा.खा. श्री. गायकवाड, एस.व्ही.एस.एस. फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वीरेंद्र मेश्राम यांनी रॅलीत हिरवा झेंडा दाखविला. रॅली जि. प. च्या परिसरात गेल्यानंतर प्रांगणात असलेल्या स्व. विलासराव देशमुख यांच्या पुतळ्यास उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले. डाऊन सिंड्रोम या स्थितीबद्दल वैज्ञानिक माहिती डीडीआरसी चे डॉ. योगेश निटूरकर यांनी दिली. डाऊन सिंड्रोम या दिव्यांग प्रवर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे कला क्षेत्रातील गुण चित्रकला, नाट्य, नृत्य, अभिनय, पोहणे याबाबतची माहिती सुरेश पाटील यांनी दिली. या कार्यक्रमाची सांगता जि. प. समाज कल्याण अधिकारी श्री. संतोषकुमार नाईकवाडी यांनी केली. समाज कल्याण विभागाच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केलेल्या विविध योजनांची माहिती दिली. शासनाच्या योजना थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या कार्याचा तपशील सांगण्यात आला.
या दिनाचे औचित्य साधून डीडीआरसी लातूरच्या वतीने रेल्वे स्थानकात जाऊन डाऊन सिंड्रोम विद्यार्थ्यांच्या हस्ते अन्य विद्यार्थ्यांकरिता “व्हील चेअर” देण्यात आले. याप्रसंगी सक्षमचे कोषाध्यक्ष प्रा. डॉ. भगवान देशमुख, श्री. बस्वराज पैके, लातूर रेल्वे स्थानकाचे प्रबंधक आर.बी. गायकवाड, मुख्य बुकिंग पर्यवेक्षक आर. बी. ढवळे मुख्य वाणिज्य निरीक्षक आर. एम. ओहोळ, श्री. सरोज धर्मराज व श्री. पंकज पाटीदार उपस्थित होते.