दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व सामाजिक न्याय अधिकारिता व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून दि. 14, 15, 16 फेब्रुवारी 2023 रोजी दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी पुणे येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत संवेदना बहुविकलांग मुलांची शाळा, हरंगुळ (बु) लातूर यास राज्यस्तरीय उपविजे प्राप्त झाले. विरोधी पक्षनेते माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. शाळेतील चि. यशराज सोलापूर, कु. वैष्णवी गोणे कु. मानवी पाटील, चि. अभिषेक कौलखेड कु. स्नेहा हाके, चि. निखिल इंजे, कु. नभा कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी 10 पारितोषिके मिळवली. शाळेतील विशेष शिक्षक श्री. सचिन राऊत, सौ. जयश्री माने, श्री. योगेश्वर बुरांडे या प्रसंगी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.