जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व समाजकल्याण जिल्हा परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने निलंगा तालुक्यातील दिव्यांग व्यक्ती साठी साधने/ मोजमाप तपासणी शिबिर
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व समाजकल्याण जिल्हा परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने निलंगा तालुक्यातील दिव्यांग व्यक्ती साठी साधने/ मोजमाप तपासणी शिबिर
दि. ०६/०१/२०२३ रोजी निलंगा येथे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व समाजकल्याण जिल्हा परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने निलंगा तालुक्यातील दिव्यांग व्यक्ती साठी साधने/ मोजमाप तपासणी शिबिर उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे आयोजित करण्यात आले. यावेळी ८५ दिव्यांगजनांची तपासणी करण्यात आली . यावेळी सिनिअर फिजिओथेरापिस्ट डॉ. श्रेयस कुलकर्णी, डॉ. पवनकुमार, डॉ. श्रध्दा नागमोडे, स्पीच थेरापिस्ट श्री रतन जाधव, आर्थोसिस श्री रूपेश जाधव, समुपदेशक, नितीन कुमार आळंदकर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे श्री बस्वराज पैके, विशेष शिक्षक श्री सचिन राऊत, संगणक टेक्निशिअन श्री अनुप दबडगावकर, श्री. आदर्श भस्मे, वाहन चालक श्री किरण क्षीरसागर, लातूर काॅलेज आॅफ थेरापी चे थेरापिस्ट, कै. वसंतराव काळे होमिओपॅथी चे विद्यार्थी कु. उमेरोमान तांबोळी कु. नाजनिन कमुपरांडे, कु. अंजली शिंदे कु. तयबा तांबोळी कु. सादिया मणियार चि. गुरुप्रसाद कदम, दिव्यांगजन, पालक, विशेष शिक्षक, , व कर्मचारी उपस्थित होते. बालाजी डावळे, मोहन खालसे, रामराव गायकवाड, व इतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.