संवेदना बहुविकलांग मुलांची शाळा, हरंगुळ (बु) लातूर येथे पालकांची बैठक संपन्न झाली
संवेदना बहुविकलांग मुलांची शाळा, हरंगुळ (बु) लातूर येथे पालकांची बैठक संपन्न झाली
आज दि. 6 जुलै 2022 रोजी संवेदना बहुविकलांग मुलांची शाळा, हरंगुळ (बु) लातूर येथे पालकांची बैठक संपन्न झाली. श्री. सुरेशदादा पाटील, प्रकल्प कार्यवाह यांनी आपल्या पाल्यांच्या प्रगतीमध्ये पालकांची भूमिका, विविध शासकीय योजना, संवेदनाचे विविध प्रकल्प यावर पालकांना विस्तृत मार्गदर्शन केले. बैठकीचा समारोप शालेय समितीचे कोषाध्यक्ष श्री. प्रभाकरराव जोशी यांनी केला. बैठकीसाठी संवेदनाच्या शालेय समितीचे अध्यक्ष श्री. व्यंकटसिंग चौहान, मुख्याध्यापिका सौ. दीपा पाटील, शालेय समिती सदस्या सौ. वर्षा सोनटक्के, विशेष शिक्षक श्री. व्यंकट लामजणे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.