डाऊन सिंड्रोम असलेल्या ६ मुलांचे मुल्यांकन व व्यायाम शिबिर आयोजित करण्यात आले
डाऊन सिंड्रोम असलेल्या ६ मुलांचे मुल्यांकन व व्यायाम शिबिर आयोजित करण्यात आले
आज दि. १०/०३/२०२२ रोजी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर येथे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपी महिला संघटन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रायसोमी जनजागृती या विषया अंतर्गत डाऊन सिंड्रोम असलेल्या ६ मुलांचे मुल्यांकन व व्यायाम शिबिर आयोजित करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या सौ डॉ. पल्लवी जाधव मॅडम, प्राध्यापिका डॉ. नेहा मंदाडे मॅडम,प्रा. डॉ. शितल घुले मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ मयुरी बिल्लावार यांनी उपस्थितांना पाहुण्यांचा परिचय करून दिला व दिनविशेषाची माहिती दिली. प्राचार्या डॉ पल्लवी जाधव यांनी डाऊन सिंड्रोम बाबत सविस्तर माहिती दिली व यावर भौतिक उपचार पद्धती चे महत्व पटवून दिले. व आहारा बाबत मार्गदर्शन केले. यावेळी पालकांना जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर च्या वतीने सर्व पालकांना आहार तक्ता देण्यात आला. आहार तज्ञ डॉ अग्निमित्र आयाचित यांनी डाऊन सिंड्रोम च्या मुलांसाठी आहार तक्ता तयार केला आहे. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी कु. प्रणिता क्षिरसागर, श्री बस्वराज पैके, व अनुप दबडगावकर यांनी परिश्रम घेतले.