संवेदना प्रकल्पामध्ये जागतिक डाऊन सिंड्रोम दिन साजरा
संवेदना प्रकल्पामध्ये जागतिक डाऊन सिंड्रोम दिन साजरा
आज दि. 23 मार्च 2022 रोजी जागतिक डाऊन सिंड्रोम दिनाच्या निमीत्ताने संवेदना बहुविकलांग मुलांची शाळा हरंगुळ (बु) लातूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लातूर येथील एसव्हीएसएस कॉलेज ऑफ फिजीओथेरपी, हासेगाव येथील फिजीओथेरपी महाविद्यालयातील विद्यार्थी, महात्मा बसवेश्वर समाजकार्य महाविद्यालय, लातूर येथील बी.एस.डब्ल्यु च्या विद्यार्थ्यांनी डाऊन सिंड्रोम असलेल्या विद्यार्थ्यांसमवेत चित्रकला स्पर्धा, डान्स, खेळ घेवून हा विशेष दिन साजरा केला. फिजीओथेरपी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपुर्ण प्रकल्प व दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती घेतली. संवेदनाच्या मुख्याध्यापिका सौ. दीपा पाटील यांनी विद्यार्थ्यांना डाऊन सिंड्रोम व अन्य दिव्यांगांविषयी माहिती सांगीतली.
कार्यक्रमास फिजीओथेरपी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. उमा पावडशेट्टी, डॉ.अनुराधा क्षीरसागर, डॉ. श्रद्धा नागमोडे, डॉ. ख्याती शहा तसेच संवेदना प्रकल्पाच्या फिजीओथेरपीस्ट डॉ. मयुरी बिल्लावार, सर्व विशेष शिक्षक, थेरपीस्ट यांच्यासह पालक शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.