अल्पदृष्टी असूनही युपीएससी परीक्षेत गगन भरारी घेणाऱ्या पुजा अशोक कदम यांना सन्मानित केले.
अल्पदृष्टी असूनही युपीएससी परीक्षेत गगन भरारी घेणाऱ्या पुजा अशोक कदम यांना सन्मानित केले.
अल्पदृष्टी असूनही युपीएससी परीक्षेत गगन भरारी घेणाऱ्या पुजा अशोक कदम यांचा सक्षम देवगिरी प्रांत, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर यांच्याकडून मंगळवार दि. 28 सप्टेंबर 2021 रोजी डीडीआरसी कार्यालय, जुना औसा रोड, लातूर येथे सत्कार करण्यात आला. या वेळी सक्षमचे महिला प्रांत प्रमुख प्रा.डॉ.प्रिती पोहेकर, प्रांत सचिव श्रीराम शिंदे, कोषाध्यक्ष डॉ. भगवानराव देशमुख डीडीआरसीचे कार्यवाह डॉ. योगेश निटुरकर संवेदना बहुविकलांग मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दीपा पाटील यांनी पुजा कदम यांना सन्मानित केले. या प्रसंगी सौ. पल्लवी पवार (पुजाची बहिण), श्री. अशोक कदम (पुजाचे वडील), फिजीओथेरपीस्ट डॉ. मयुरी बिल्लावार, विशेष शिक्षिका प्रणिता क्षीरसागर, श्री. बस्वराज पैके, श्री. अनुप दबडगावकर व श्री. आत्माराम पळसे व सौ. राधिका देशमुख उपस्थित होते.
मुळ गाव टाका ता.औसा, ग्रामीण भागातील कदम कुटुंबिय आहे. वडिल निवृत्त शिक्षक आहेत. वडिलांनी शिक्षणाचे महत्व जाणल्यामुळे घरात सर्व मुली उच्च शिक्षण घेवून मोठ्या पदावर कार्यरत आहेत. पुजा आपल्या दिव्यांगत्वावर मात करुन गरुड भरारी घेतली आहे. तिच्या भविष्यातील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.