संवेदना प्रकल्पा मध्ये अंशकालीन निवासी कार्यशाळा!!
संवेदना प्रकल्पा मध्ये अंशकालीन निवासी कार्यशाळा!!
संवेदना प्रकल्पा मध्ये अंशकालीन निवासी कार्यशाळा!! शनिवार दि.6/10/21 रोजी हरंगुळ(बु) लातुर येथे पालकांची बैठक झाली. या बैठकीत बौध्दीक दिव्यांग विद्यार्थ्यांची अंशकालीन निवासी(सोमवार ते शुक्रवार) कार्यशाळेचा उपक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने विचार करण्यात आला, 12 ते 18 वयोगटातील मर्यादित विद्यार्थ्यांसाठी आहे. विशेष शिक्षण, पूर्व व्यावसायीक, व्यावसायीक प्रशिक्षण, विविध थेरापि(फिजिओ, आॅक्युपेशनल, स्पीच), कला—संगीत,चित्रकला,नाटक, क्रिडा, या बाबींचा विचार करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार स्वतंत्र कक्षामध्ये निवासाची सोय, स्वच्छतागृहाची रचना,वर्गखोल्या,सभागृह,अशी रचना केलेली आहे. अल्पोपहार, न्याहरी, दोन वेळेचे भोजन ही व्यवस्था केली आहे. यासाठी आवशक्य शिक्षक, काळजी वाहक यांची नियुक्ती प्रकल्पानी केली आहे. यामुळे दिव्यांग मुलांना नियमीत थेरापि, पूर्व व्यावसायीक शिक्षण मिळेल. अधीक माहिती साठी संपर्क श्री सचिन राऊत 8830305040