जवाहर नवोदय विद्यालय व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाचा कार्यक्रम संपन्न
जवाहर नवोदय विद्यालय व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाचा कार्यक्रम संपन्न
आज दि. 3 डिसेंबर 2021 रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवोदय मधील दिव्यांग विद्यार्थ्यांचा सन्मान संवेदना प्रकल्पाचे मा.अध्यक्ष डॉ. राजेश पाटील व प्राचार्य जी रमेश राव यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी डॉ. राजेश पाटील म्हणाले की, समाजामध्ये दिव्यांगांच्या बाबतीत संवेदना निर्माण व्हायला हवी. नवोदय मधील आपण हुशार विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासासोबतच सामाजिक जाणिवेची जपणूक करायला हवी. आपण दिव्यांगांना समान वागणूक द्यावी.
या प्रसंगी जागतिक दिव्यांग दिनाचे महत्व संवेदना प्रकल्पाचे श्री. व्यंकट लामजणे यांनी विषद केले. दिव्यांगांच्या विविध प्रकारांचे सादरीकरण फिजीओथेरपीस्ट मयुरी बिल्लावार यांनी केले. तर श्री. योगेश्वर बुरांडे यांनी निरामय आरोग्य विमा योजनेची माहिती दिली. प्राचार्य श्री. जी रमेश राव यांनी संत सुरदास, हेलन केलर यांची उदाहरणे देऊन दिव्यांगसुद्धा उंच भरारी घेऊ शकतात असे प्रतिपादन केले.