Home
About Us
About Samvedana
Scheme
GHARONDA
Day Care Center
Respite Center
Parent Training Center
Teachers Training
Niramaya Scheme
NGO Training Center
Samvedana ITI
Therapies
Physiotherapy
Neuro Development
Speech Therapy
Music Therapy
Occupational Therapy
Blogs
Gallary
Video
Download
Donate Now
Contact
दिव्यांगा करीता कृत्रीम साहित्य देण्याचे मोजमाप शिबिर
दिव्यांगा करीता कृत्रीम साहित्य देण्याचे मोजमाप शिबिर
सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार अंतर्गत अलिम्को, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र , समाजकल्याण विभाग
जिल्हा परिषद, लातूर , पंचायत समिती कार्यालय, लातूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर शहर व लातूर तालूक्यातील
दिव्यांगा करीता कृत्रीम साहित्य देण्याचे मोजमाप शिबिर दि. 3 जानेवारी 2020 रोजी क्रीडा संकुल लातूर येथे आयोजित करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संजय दोरवे मा. सभापती समाजकल्यण विभाग जिल्हा परिषद हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रकाश
देशमुख मा.सभापती आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सौ. सरस्वती पाटील मा. सभापती पंचायत समिती, श्री प्रकाश उखाडे उपसभापती पंचायत समिती श्री सुनिल यादव विभागीय
अधिकारी, श्री संतोष जोशी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी, श्री रत्नराज जवळगेकर मुख्य लेखा व वित्त अधिकारी, श्री सुरेश पाटील
राज्य समन्वय सदस्य, श्री स्वप्निल पवार तहसीलदार, डॉ. माधव शिंदे आणि शासकीय वैदयकीय महाविद्यालयाचे डॉक्टर यांची प्रमुख
उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संतोषकुमार नाईकवाडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी केले. या उपस्थितांना श्री प्रकाश
देशमुख व श्री संजय दोरवे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी श्री सुरेश पाटील यांनी सांगीतले की, लातूर जिल्हा प्रशासनाने विशेषत: पंचायत
समितीचे गटविकास अधिकारी यांनी महत्वपुर्ण काम केल्यामुळे या ठिकाणी दिव्यांगाची मोठी संख्या दिसत आहे.
या शिबिरामध्ये ज्या दिव्यांग व्यक्तीकडे वैदय़कीय प्रमाणपत्र उपलब्ध नाही त्यांच्य़ासाठी शासकीय वैदयकीय महाविद्यालयाचे पथक
येथे उपलब्ध केले आहे. उत्पन्नाचा दाखला मिळण्यामध्ये अडचण येउ नये याकरीता तहसीहदार श्री स्वप्निल पवार यांनी आवश्यक ते
कर्मचाऱ्यांची नियुक्ती शिबिर स्थानी केली आहे.
शिबिराला महापौर श्री विक्रांत गोजमुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. ईटणकर साहेब यांनी भेट दिली. या
शिबिराकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी आणि पंचायत समिती लातूर यांच्याकडून झालेल्या व्यवस्थेचे कौतूक दिव्यांग बंधू-भगिनी करीत
होते. बी.एस.डब्यु चे विद्यार्थी आणि महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी केलेली दिव्यांगाची मदत कौतुकास्पद आहे. दिव्यांग शाळेतील
मुख्याध्यापक, शिक्षक, दिव्यांगासाठी कार्य करणाऱ्या विविध संस्था यांचा सहभाग मोलाचा होता.
2459 दिव्यांग बंधु-भगिनीचे शिबिर संपन्न झाले.
Recent Posts
17 सप्टेंबर 2023 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष निमित्त जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. वैजनाथ मारुती व्हनाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण
संवेदना प्रकल्पामध्ये मैत्र फाउंडेशन प्रस्तुत मर्यादांच्या अंगणात वाढताना या पुस्तकाचे लेखक श्री अरुण लोहकरे व सौ. सुजाता लोहकरे यांचे मार्गदर्शन
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर चे कार्य कौतुकास्पद आहे. मा.श्री. हसनजी मुश्रीफ (मा.वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र शासन)
संवेदना प्रकल्प आयोजित व राष्ट्रीय न्यास प्रायोजित "स्व वकालत" या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
महाराष्ट्र व गोवा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) एकूण पन्नास सेवानिवृत्त अधिकारी,कर्मचारी यांनी रा. स्व. संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) संचलित , संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु.) या सेवा प्रकल्पास भेट दिली
आप दिव्यांगों को अलग नजर से न देखें, हमेशा सहाय्यता, ओर सहानुभूति देकर उनका निम्न मुल्यांकन न करें।
उन्हें समान अवसर देकर उनकी प्रतिभा को अंकुरित एवं विकसित होने दें।
Donate Now