संवेदना प्रकल्प हरंगुळ येथे राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांची आरोग्य चिकित्सा शिबिर संपन्न दि. 1 जुलै 2025 रोजी डॉक्टर्स डे दिनानिमित्त विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय लातूर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर्स डे दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांची ची मोफत आरोग्य चिकित्सा आभा कार्ड काढून देण्यासाठी आरोग्य चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचा प्रारंभ धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी 252 विद्यार्थ्यीं व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. व आवश्यक दिव्यांगजनांना औषधे देण्यात आली. ज्या मुलांना अपस्मार (epilepsy) चा त्रास आहे.अशांना मोफत औषधोपचार नियमितपणे देण्याची योजना करण्यात आली. 78 जनांचे आभा कार्ड काढण्यात आले. वैद्यकीय समन्वयक डॉ. मेघराज चावडा, वैद्यकीय अधिकारी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लातूरच्या श्रीमती डॉ. पुनम राठोड, शिबिर समन्वय श्री हेमंत लोहारे, डॉ. राधिका कलेकर सहाय्यक प्राध्यापक ( दंतरोग विभाग), डॉ. किशोर जाधव नेत्रचिकीत्सक, डॉ. वैष्णवी भांगडिया, (नेत्र चिकित्सा), डॉ. सुकन्या पुरी( त्वचा रोग) डॉ नागनाथ निलंगेकर( शल्य चिकित्सक ), डॉ. प्रतिक गुंडरे ( अस्थिरोग चिकित्सा), डॉ. महेश पाटील ( बालरोग चिकित्सा) डॉ.पूजा दहिफळे ( स्त्रीरोग चिकित्सा), डॉ. श्रद्धा निटूरे ( मनोरुग्न चिकित्सा) यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली व त्यांना श्री विशाल सोळंके (औषध निर्माता), यांनी औषध पुरवठा केला. राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ राजेश पाटील, शैक्षणिक समितीचे अध्यक्ष अँड. श्रीराम देशपांडे , संवेदना बहु दिव्यांग शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती दीपाताई पाटील, यांनी उपस्थित सर्व डॉक्टरांचा सत्कार केला. यावेळी संवेदना प्रकल्पातील फिजीओथेरपीस्ट श्रीमती मयुरी बिल्लावार, विशेष शिक्षिका, श्रीमती जयश्री माने, श्रीमती प्रणिता दबडगावकर, संगीत शिक्षक योगेश बुरांडे, विशेष शिक्षक सचिन राऊत, शिवाजी चौरे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे व्यवस्थापक श्री बसवराज पैके, संतोष कोळगावे, विशेष शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते आभा कार्ड काढण्यासाठी श्री प्रबुद्ध कांबळे व श्री सागर मुळे यांनी परिश्रम घेतले.
04/07/2025