जनकल्याण समितीच्या कार्यावर समाजाची विश्वासार्हता वृद्धिंगत झालेली आहे- श्री शरदभाऊ खाडिलकर.
जनकल्याण समितीच्या कार्यावर समाजाची विश्वासार्हता वृद्धिंगत झालेली आहे- श्री शरदभाऊ खाडिलकर.
रा. स्व. संघ जनकल्याण समिती,(महाराष्ट्र प्रांत) संचलित, संवेदना प्रकल्पाचा कार्यक्रम, शनिवार, दि. 10 जून 2023 रोजी संपन्न झाला. “घरोंदा” जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या विस्तारित “श्रीमती गीता मोहता भवन” या इमारतीचा लोकार्पण समारंभ नदीहात्तरगा, (किल्लारी सहकारी साखर कारखान्याच्या मागे) ता. निलंगा जि. लातूर येथे झाला. बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग असलेल्या अठरा वर्षावरील व्यक्तींचे निवासी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र आहे. कार्यक्रमाची सुरुवात श्री. योगेश्वर बुरांडे यांनी गायलेल्या “ निर्मल पावन भावना, सभी के सुख की कामना” या गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक पोतदार, किल्लारी यांनी केले. निवासी केंद्रामध्ये दिव्यांग मुलांना त्यांच्या गरजेनुसार व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. पेपर कप निर्मिती सहाय्यता करणे, मेडिकल दुकानात लागणारे पाकीट तयार करणे, केंद्रातील परिसरात फळे, फुले, भाज्यांची लागवड करणे. भाज्या काढणे, प्रकल्पातील अन्नपूर्णांमध्ये वापर करणे ही कामे येथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने दिव्यांग विद्यार्थी करीत असतात. या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे किल्लारीचे मा. तालुका संघचालक श्री. बाबासाहेब कुंभार, नदीहात्तरगा गावचे सरपंच श्री. मोहनराव कुनाळे यांचे मनोगत झाले. संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह श्री. सुरेश पाटील यांनी या विषयाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन या विषयावर भाष्य केले. मोहता फाउंडेशन मुंबई यांची माहिती करून दिली. त्यांच्या सहकार्याने “श्रीमती गीता मोहता भवन” निर्माण झालेले आहे. राष्ट्रीय न्यास चा घरोंदा प्रकल्प व राष्ट्रीय न्यास चे कार्य यासंबंधीची माहिती सुद्धा श्री. सुरेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. समारंभाचे उद्घाटन श्रीमती अश्विनी फेणाणी यांनी प्रकल्पाच्या कार्याचे कौतुक करून समाजामध्ये दिव्यांगाकरिता अशा केंद्राची गरज कशी आहे? ते विगत केले. जनकल्याण समितीचे प्रांत संघटनमंत्री श्री. शरद भाऊ खाडिलकर यांनी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की या उपक्रमाचे नाव “घरोंदा” केंद्र आहे घरोंदा हिंदी शब्द आहे. घरोंदा म्हणजे "घरटे"!! पक्षी पिलासाठी घरटे तयार करीत असतात. तयार झालेल्या घरट्यामध्ये पिल्याला अन्न पुरवून सक्षम बनवितात. पिल्ले मोठे झाले की त्यांच्या पंखात बळ येते. त्या बळाच्या आधारावर पक्षांची पिल्ले आकाशाला गवसणी घालतात. त्याप्रमाणे येथील दिव्यांग मुलांना विविध उपक्रमाच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणातून दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा मानस जनकल्याण समितीचा असल्याचा उल्लेख श्री. शरदभाऊ यांनी या प्रसंगी करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी निलंग्याचे तहसीलदार श्री. महेश आळंदकर होते. या कार्यक्रमांमध्ये विवेकानंद मेडिकल फाॅऊंडेशन यांनी दिव्यांग प्रकल्पासाठी त्यांची जागा दानपत्र करून दिल्याबद्दल जनकल्याण समिती संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. रमेशराव जोशी यांच्या हस्ते विवेकानंद रुग्णालयाचे उपाध्यक्ष श्री. उदय लातूरे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमात दिनेश माने, वरद कुलकर्णी, हिराबाई गवळी या दिव्यांग मुलांचा त्यांच्या राष्ट्रीय संमेलनातील उत्कृष्ट कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पालक, नदीहत्तरगा व किल्लारी गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामसेवक, तलाठी, मंडल अधिकारी,प्रकल्पाचे हितचिंतक आवर्जून उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रकल्पाचे सहकार्यवाह डाॅ योगेश निटुरकर यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे,मोहता कंपनी मुबंई, विवेकानंद हाॅस्पिटल लातुर यांचे आभार समिती सदस्य श्री केशव तिपणबोणे यांनी व्यक्त केले. फिजिओथेरापिस्ट मयुरी बिल्लावार यांनी कल्याण मंत्र म्हटल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.