कोरोनाच्या विपरीत परिस्थितीमध्ये संचारबंदी सुरु असताना संवेदना बहुविकलांग मुलांच्या शाळेकडून दिव्यांग विद्यार्थ्यांशी विशेष शिक्षक, थेरपीस्ट यांचे ऑनलाईन विशेष वर्ग सुरु करण्यात आले आहेत. दि. 13 मे 2020 रोजी विशेष विद्यार्थी, पालक, शिक्षक यांची ऑनलाईन बैठक संपन्न झाली. यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दीपा पाटील यांनी मार्गदर्शन केले. सर्व विशेष शिक्षकांनी विद्यार्थी – पालक यांचे वॉट्स अँप ग्रुप तयार केले आहेत. त्याद्वारे विशेष शिक्षण, विविध थेरपी, संगीत यांचे ऑनलाईन वर्ग सुरु करण्यात आले आहेत.
फिजीओथेरपीस्ट व स्पीच थेरपीस्ट यांनी बहुविकलांग , आत्ममग्न, डाऊन सिंड्रोम , सेरेब्रल पाल्सी व मतिमंद अशा विविध गटातील विद्यार्थ्यांचे गट तयार केले आहेत. त्यांचे स्वतंत्र फिजीओथेरपी सेशन सुरु आहेत. इयत्ता 10 वीच्या विशेष विद्यार्थ्यांचेही ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. बैठकीदरम्यान जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर मार्फत दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तुंचे कीट वितरण कार्यक्रमाचे निवेदन विशेष शिक्षक श्री. व्यंकट लामजणे यांनी केले. बैठकीकरिता श्री.डॉ. योगेश निटुरकर, सहकार्यवाह, सर्व थेरपीस्ट, विशेष शिक्षक, पालक यांची उपस्थिती होती.