समदृष्टी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ (सक्षम), लातूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर (सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक रक्तदान दिनी दि. 14 जून 2020 रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. देशपातळीवर दिव्यांगांकरिता सक्षम ही संस्था कार्यरत आहे. लातूर जिल्ह्यामध्ये दिव्यांगांसाठी जिल्हा अधिवेशन, साहित्य वाटप आदी कार्यक्रम सक्षमच्या वतीने प्रतिवर्षी घेण्यात येत असतात.
दि. 14 जून रोजी जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून सक्षम लातूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांगांच्या प्रकारानुसार हेमीफिलीया, सिकलसेल सारख्या दिव्यांगाना सतत रक्ताची आवश्यकता भासते. याकरिता एक रक्तदान दिव्यांगांसाठी रक्तदान ही योजना आखण्यात आली आहे. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लक्ष्मी नगर, जुना औसा रोड, लातूर या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत रक्तदान संपन्न झाले. शिबीराचे उदघाटन सक्षम केंद्रीय कार्यकारिणी सदस्य श्री. सुरेशजी पाटील, जिल्हा अध्य़क्ष डॉ शिवाजीराव काळगे, संवेदना प्रकल्प अध्य़क्ष डॉ. राजेशजी पाटील, समाजकल्याण विभागाचे वैसाका श्री. भारत कांबळे यांच्या हस्ते झाले.
सक्षम ही सर्व प्रवर्गातील दिव्यांगांसाठी कार्य करणारी राष्ट्रीय संस्था आहे. आजच्या रक्तदानामध्ये अनेक दिव्यांग व्यक्तींचा आणि दिव्यांग व्यक्तींच्या पालकांचा उत्स्फुर्त सहभाग होता. प्रा. प्रिती पोहेकर, श्रीराम शिंदे, योगेश डांगे, सौ. दीपा पाटील, बस्वराज पैके, सक्षम जिल्हा सचिव श्री. दिपक क्षीरसागर, योगेश शेळके, श्री. डांगे, योगेश्वर बुरांडे, अनंत पाठक, व्यंकट लामजणे आदींनी सहभाग नोंदविला.