दिव्यांगांसाठी संवेदना प्रकल्पाचे कार्य कौतुकास्पद आहे - मा. आ. संभाजीराव पाटील निलंगेकर
दिव्यांगांसाठी संवेदना प्रकल्पाचे कार्य कौतुकास्पद आहे - मा. आ. संभाजीराव पाटील निलंगेकर
दि. 23 ऑक्टोबर 2020 रोजी जी आय सी कडून संवेदना प्रकल्पासाठी स्कुल बस देण्यात आली. या हस्तांतरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर होते. या कार्यक्रमावेळी श्री. संभाजीराव निलंगेकर म्हणाले की, जनकल्याण समितीचे कार्य समाजाभिमुख आहे. जनकल्याण समितीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या संवेदना प्रकल्पाचे कार्य दिव्यांगांकरिता कौतुकास्पद आहे. या कार्यमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. अभिनव गोयल होते. ते म्हणाले की, दिव्यांग हा समाजातील दुर्लक्षित वंचित घटक आहे. अशा घटकासाठी आम्हाला कांही करता आले तर त्याचा आम्हाला मनापासून समाधान लाभते. मी माझ्या प्रशासकीय कार्यात दिव्यांगांकरिता प्राधान्याने विचार करीत राहीन.
भारतीय साधारण बीमा निगमचे सहाय्यक महाव्यवस्थापक श्री. नामदेव कदम यांनी स्कुल बसच्या चाव्या प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्याकडे सुपुर्द केले. सी एस आर योजनेअंतर्गत देशभरात आम्ही विविध प्रकल्प हाती घेतलेले आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये दिव्यांगांकरिता उदगीर व निलंगा येथे कृत्रिम साधने वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. अनेक दिव्यांग बंधू भगिनींना सहाय्य करण्याची संधी मिळाली. संवेदना प्रकल्पाचे काम पाहून मुलांची ये – जा करण्याकरिता स्कुल बस देण्याचा विचार जी आय सी ने केला. आज प्रत्यक्ष या प्रकल्पावरती येवून मा. संभाजीरावांच्या मार्गदर्शनाखाली हा हस्तांतरणाचा कार्यक्रम होत आहे. याचा मला मनस्वी आनंद होत आहे.
या कार्यक्रमाच्या ठिकाणी संवेदना प्रकल्पामध्ये शीघ्र निदान व उपचार विभागाचे उदघाटन करण्यात आले. येथील उपक्रमाची माहिती स्पीच थेरपीस्ट सौ. सपना डाके यांनी विषद केली. बौद्धीकदृष्ट्या दिव्यांग मुलांच्या पालकांचे निवासी प्रशिक्षण, फिजीओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी इ.. उपक्रमांची माहिती प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प कार्यवाह श्री. सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. समिती सदस्य प्रा. राजेश्वर बेंबडे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. व्यंकट लामजणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. सुनिल खमितकर, श्री. संतोष नाईकवाडी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ तिरुके, जिल्हा परिषद सदस्य श्री. सतिष पाटील, जनकल्याण समितीचे प्रांत सहकार्यवाह श्री. अरुण डंके, जनकल्याण समितीचे जिल्हा अध्यक्ष श्री. शिरीष पानगावकर, श्री. शाम भराडिया, श्री. डॉ. श्रीनिवास संदीकर, क्लिनीकल सायकॉलॉजीस्ट आळंदर, श्री. राजेश सुगरे, श्री. राहूल देशपांडे, सौ. अश्विनी लातूरे, पालक, हितचिंतक यांची उपस्थिती होती.