दिव्यांगांनी स्वत:चा शोध घ्यावा – श्री. यजुवेंद्र महाजन
दिव्यांगांनी स्वत:चा शोध घ्यावा – श्री. यजुवेंद्र महाजन
संवेदना प्रकल्प व सक्षम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामध्ये दिव्यांगांकरिता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सेवा केंद्राचे उदघाटन अभासी पद्धतीने आज दि. 8 नोव्हेंबर 2020 रोजी दीपस्तंभचे श्री. यजुवेंद्र महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. यजुवेंद्र महाजन म्हनाले की, दिव्यांगांचे करीयर कॉऊन्सेलींग होणे आवश्यक आहे.तसेच त्यांना आत्मसन्मानाने जगण्यासाठी प्रेरणा देणे महत्वाचे आहे. संवेदना प्रकल्पाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठीसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व सेवा केंद्र हा स्तुत्य उपक्रम आहे. मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील गरजू दिव्यांगांना याचा लाभ होणार आहे. यानंतर श्री. दादासाहेब गायकवाड सदस्य स्पर्धा परीक्षा केंद्र यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.डॉ.भगवानराव देशमुख यांनी केले. अभासी पद्धतीने मोठ्या प्रमाणावर दिव्यांग व्यक्तींनी या कार्यक्रमास सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. व्यंकट लामजणे यांनी केले. कार्यक्रमासाठी श्री. बस्वराज पैके, श्री. अनुप दबडगावकर यांनी परीश्रम घेतले.