संवेदना शाळेमध्ये महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली
संवेदना शाळेमध्ये महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली
दि. 2 ऑक्टोबर 2019 रोजी संवेदना शाळेमध्ये महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळेतील कु. नभा कुलकर्णी व चि. वेदांत सारंगे या विशेष मुलांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल सर्व मुलांना माहिती करुन दिली. सेविका श्रीमती भिसे यांनी मुलांना लालबहादुर शास्त्री यांच्या बद्दल माहिती दिली. गांधी जयंती निमित्त सर्व भारतभर सुरु असलेल्या स्वच्छता अभियानामध्ये या विशेष मुलांनी देखील सहभाग नोंदविला. या निमित्ताने सर्व मुलांनी स्वच्छता व प्लास्टिक वापर बंदी बाबत ची प्रतिज्ञा घेतली. अशा प्रकारे विशेष मुलांनी प्लास्टिक पिशवी व कापडी पिशवी याबद्दलचे आपले मत चेहऱ्यावरील हावभावाने नोंदविले.
आज दि. 3 ऑक्टोबर 2019 रोजी संवेदना शाळेमध्ये जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन साजरा करण्यात आला. विशेष शिक्षिका कु. प्रणिता क्षिरसागर यांनी मुलांना या दिनाचे महत्व सांगीतले. यावेळी मुलांनी अष्टावक्र ऋषी यांच्या प्रतिमेचे पुजन केले. डॉ. पेरीन कावाझ मुल्लाफिरोज यांच्या जन्मदिनाचे व या क्षेत्रातील त्यांच्या कार्याच्या योगदानाचे ही स्मरण करण्य़ात आले. यानिमित्ताने शाळेतील सर्व मुलांनी शाळेच्या आवारात आज पदयात्रा केली. नंतर ‘सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांचा आदर करा, त्यांच्या भावनांचा सन्मान करा’ याच आशयाच्या चित्रांत रंग भरले व आपली चित्रकला ही येथे सादर केली.