पुणे येथे दिव्यांग मुलांच्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा संपन्न झाल्या
पुणे येथे दिव्यांग मुलांच्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा संपन्न झाल्या
दि. 18 सप्टेंबर 2019 रोजी पुणे येथे दिव्यांग मुलांच्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत ‘संवेदना’ बहुविकलांग मुलांच्या शाळेच्या ‘घरटी’ या नाटकास प्रथम पारितोषिक मिळाले. या नाटकाचे दिग्दर्शन सौ. जयश्री माने यांनी केले होते. यासाठी प्रथम क्रमांकाचे आणि ‘खारुताई’ या पात्रा करीता कु. नभा कुलकर्णीस प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ही स्पर्धा पुणे येथील नवक्षितीज या संस्थेनी आयोजित केले होते. संवेदना शाळेतील 12 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. संगीत शिक्षक श्री योगेश्वर बुरांडे, सेविका श्रीमती सरीता भडके, अमोल बंडगर यांनी मेहनत घेतली होती. सर्वांचे कौतुक पालकांमधुन होत आहे. जनकल्याण समितीच्या प्रांत कार्यालयाकडून मुलांच्या निवास, भोजन, यातायातची व्यवस्था करण्यात आलेली होती.