संवेदना शाळेत आज दि. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला
संवेदना शाळेत आज दि. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला
संवेदना शाळेत आज दि. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. श्री व सौ. शामजी भराडीया यांच्या हस्ते गणेश आरती करण्यात आली. त्यानंतर संवेदनाचे विद्यार्थी चि. सारंगे व कु. नभा कुलकर्णी यांनी शिक्षक दिनाचे महत्व सांगीतले. त्यानंतर प्रकल्प कार्यवाह श्री सुरेश दादा पाटील व श्री शामजी भराडीया यांनी सर्व शिक्षक, काळजीवाहक यांचा सन्मान केला. प्रसंगी शामजी भराडीया यांनी आपले काम इश्वरी कार्य आहे त्याला मी नमन करतो असे मनोगत व्यक्त केले.